गड- पॉलिटेक्निक फेरपरिक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गड- पॉलिटेक्निक फेरपरिक्षा
गड- पॉलिटेक्निक फेरपरिक्षा

गड- पॉलिटेक्निक फेरपरिक्षा

sakal_logo
By

अंतिम वर्षातील अनुतीर्ण विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा
पॉलिटेक्निक; २१ सप्टेंबर ते ४ आक्टोबरअखेर लेखी परीक्षा

सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २५ : दहावी- बारावी परीक्षेच्या धर्तीवर यंदापासून पदविका अभियांत्रिकी (पॉलिटेक्निकच्या) अंतिम वर्षातील अनुतीर्ण विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय झाला आहे. तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत विधानमंडळात घोषणा केली होती. यासाठी विद्यार्थ्यांची मागणी होती. याचा विद्यार्थ्यांना नोकरीसह पुढील शिक्षणासाठी उपयोग होणार आहे. पुढील महिन्यात २१ सप्टेंबर ते ४ आक्टोबरअखेर ही लेखी परीक्षा होणार आहे.
पंधरा दिवसापूर्वी ऑनलाईन निकाल जाहीर झाला. गेल्या आठवड्यात गुणपत्रिका मिळाल्या. गतवर्षीची उन्हाळी परीक्षा ऑफलाईन झाली. ऑनलाईनच्या तुलनेत ऑफलाईन परीक्षेचा निकाल कमी लागल्याचा विद्यार्थ्यांची तक्रार होती. पण, तंत्रशिक्षण मंडळाने हा गैरसमज असल्याचे आकडेवारीसह परिपत्रकातून सिद्ध केले होते. अलिकडे पॉलिटेक्निकनंतर आभियांत्रिकी पदवीला प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे तुतीय वर्षात अनुतीर्ण विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जात होते. त्यासाठी दहावी, बारावी परीक्षेच्या धर्तीवर पॉलिटेक्निकसाठीही अनुतीर्ण विद्यार्थ्यांसाठी फेरपरिक्षा घ्यावी अशी मागणी होती.
फेरपरीक्षेची माहिती परिपत्रकाद्वारे राज्य तंत्रशिक्षण मंडळाने संस्थाना कळविली आहे. अनुतीर्ण विद्यार्थ्यांसाठी गरज पडल्यास खास अध्यापन वर्ग घेण्याची सुचनाही मंडळाने संस्थाना केली आहे. सराव परीक्षा घेण्याचेही सुचविले आहे. फेरपरीक्षेसाठी गुणपडताळणी, फोटोकॉपी, पुर्नमूल्यांकन सुविधा मिळणार नसल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.

चौकट
दृष्टिक्षेपात परीक्षा...
अर्ज स्वीकृती- ५ ते ७ सप्टेंबर
परीक्षा ओळखपत्र- १३ सप्टेंबर
प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा- १५ ते १७ सप्टेंबर
लेखी परीक्षा- २१ सप्टेंबर ते ४ आक्टोबर

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90455 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..