थर्माकोल विघटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

थर्माकोल विघटन
थर्माकोल विघटन

थर्माकोल विघटन

sakal_logo
By

४५६५१


वापरकर्त्यांनीच थर्माकोलचे विघटन करावे
प्रमोद पुंगावकर; पंचगंगा नदी घाटावर विद्यार्थ्यांना दाखविले प्रात्यक्षिक
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. २४ ः थर्माकोलचे विघटन होत नसल्याने पर्यावरणास धोका आहे. त्यामुळे थर्माकोलचा वापर टाळावा, अशी जागृती पर्यावरणप्रेमी करीत आहेत. मात्र थर्माकोलचे विघटन होऊ शकते, याचे प्रात्यक्षिक आज पंचगंगा नदी घाटावर झाले. थर्माकोल वापरकर्त्यांनीच ते विघटन करावे तसेच नदीत व नैसर्गिक जलस्त्रोतामध्ये थर्माकोल टाकून प्रदूषण वाढवू नये, असे आवाहन रेफ्रिजरेशन सोसायटीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पुंगावकर यांनी केले.
लोकराजा राजर्षी शाहू महाराज जयंती लोकोत्सव समिती, पंचगंगा संवर्धन समिती व रेफ्रिजरेशन ॲण्ड एअर कंडिशन सर्व्हिसिंग सेंटर सोसायटीतर्फे थर्माकोल विघटनाचे प्रात्यक्षिक पंचगंगा नदी घाटावर झाले. यावेळी ते बोलत होते.
टाकावू प्लास्टिकपासून तयार केलेल्या ऑईलमध्ये निरुपयोगी असलेले थर्माकोल घालून ठेवावे. काही काळाने या आईलमध्ये थर्माकोल विरघळते. एक किलो ऑईलमध्ये एक किलो थर्माकोल विरघळते, असे प्रात्यक्षिक दाखवले. विरघळलेल्या थर्माकोलचा पुनर्वापर करताना डिझेल, फॉसिल, फ्युएल शेवटी डांबर तयार होते, अशी माहिती श्री. पुंगावकर यांनी दिली.
अतुल इंगळे, स्वप्निल मुळे, भाऊ घोडके, अजित पोवार, रमेश मोरे, सुरेश मिरजकर आदी उपस्थित होते.

थर्माकोल जाळू नये
अन्न पॅकिंग, बांधकाम, फर्निचर वस्तू ठेवण्यासाठी तसेच मासे, मटण, औषधे, अन्नपदार्थ थंड किंवा अतिथंड ठेवण्यासाठीचे आवरण म्हणून थर्माकोलचा वापर होतो. ते जाळल्यास त्यातून तयार होणारा वायू पर्यावरण प्रदूषित करतो. त्यामुळे तो जाळू नये. असा कचरा स्वतंत्र डब्यात साठवावा. तो एकत्रित पुनर्प्रिक्रियेसाठी पाठवावा.

थर्माकोलमुक्त गणेशोउत्सव
शासनाने सिंगल युज वापराच्याथर्माकोलवर बंदी घातली आहे. यात जेवणाच्या प्लेट, सजावटीचे साधने आदी थर्माकोलच्या वस्तू वापरता येणार नाहीत. त्यामुळे यंदाचा गणेशउत्सवही थर्माकोल मुक्त साजरा करावा, असे आवाहनही श्री. पुंगावकर यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90466 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..