पर्यावरणपूरक विसर्जनाचा इचलकरंजीत निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यावरणपूरक विसर्जनाचा
इचलकरंजीत निर्णय
पर्यावरणपूरक विसर्जनाचा इचलकरंजीत निर्णय

पर्यावरणपूरक विसर्जनाचा इचलकरंजीत निर्णय

sakal_logo
By

45658
इचलकरंजी ः महापालिकेत गुरुवारी झालेल्या बैठकीस उपस्थित (डावीकडून) सुधाकर देशमुख, राहुल रेखावार, प्रकाश आवाडे, शैलेश बलकवडे, जयश्री गायकवाड.

पर्यावरणपूरक विसर्जनाचा
इचलकरंजीत निर्णय
विविध ठिकाणी कृत्रिम कुंड उभारणार
इचलकरंजी, ता. २५ ः शहरात पर्यावरणपूरक विसर्जन सोहळ्याचा निर्णय आज घेण्यात आला. त्याचवेळी पंचगंगा नदीत गणेश मूर्तींचे विसर्जन करू दिले जाणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले. त्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून नदी मार्गावर जास्त खोलीचे कृत्रिम जलकुंड उभारण्याचा निर्णय महापालिकेत झालेल्या प्रशासनाच्या बैठकीत घेण्यात आला. महापालिकेने त्याची तत्काळ कार्यवाही सुरू केली आहे.
बैठकीस आमदार प्रकाश आवाडे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, प्रशासक सुधाकर देशमुख, अपर अधीक्षक जयश्री गायकवाड, उपअधीक्षक बाबूराव महामुनी, अपर तहसीलदार शरद पाटील उपस्थित होते. कोणत्याही परिस्थितीत शहापूर खाणीत मूर्ती विसर्जित करणार नाही, अशी ठाम भूमिका आमदार आवाडे यांनी घेतली.
बैठकीत मूर्ती विसर्जनासंदर्भात सविस्तर आढावा घेण्यात आला. शहापूर खाण प्रदूषित आहे. तेथे मूर्ती विसर्जन करणार नाही, अशी आमची ठाम भूमिका असल्याचे आवाडे यांनी सांगितले. या संदर्भात पर्यावरणमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतील चर्चेला तपशीलही त्यांनी सांगितला. महापालिकेने विसर्जनाची सक्षम पर्यायी यंत्रणा उभी केल्यास त्याला सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पंचगंगा नदीमध्ये मूर्ती विसर्जन करता येणार नाही, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर अन्य पर्याय तयार करण्यावर एकमत झाले. यामध्ये नदीवेस नाक्यापासून यशोदा पुलापर्यंत रस्त्यांच्या दोन्ही बाजूस शक्य त्याठिकाणी मोठे कृत्रिम जलकुंड तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर शहरात विविध शंभर ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंड ठेवण्यात येणार आहेत. शिवतीर्थ ते नदीवेस नाका विसर्जन मिरवणुकीचा मार्ग कायम ठेवला जाईल, असा महत्त्वपूर्ण निर्णयही बैठकीत झाला.
सर्वांनी शक्य असेल तेथे विहिरी व अन्य पर्यायी ठिकाणी मूर्ती विसर्जन करावे, विसर्जन कुंडाच्या ठिकाणी दिल्या जाणाऱ्या मूर्ती योग्य ठिकाणी विसर्जित केल्या जातील, याची पुरेपुर काळजी प्रशासनाकडून घेतली जाईल. नागरिकांनीही प्रदूषण होऊ नये, याची दक्षता घेत विसर्जन करावे, असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बैठकीनंतर सांगितले. कृत्रिम जलकुंडाचा सार्वजनिक मंडळे व नागरिकांनी वापर करावा. त्याचबरोबर आवाजाच्या मर्यादेचे पालन करावे, असे आवाहनही श्री. बलकवडे यांनी केले.

शहापूर खाण प्रदूषित असल्याने पंचगंगा नदीतच विसर्जनास परवानगी द्यावी, अशी मागणी होती. त्याला पर्याय देण्याची गरज होती. त्यावर कृत्रिम कुंडाचे पर्याय सुचविले. त्यास आमदार आवाडे यांनी सहमती दर्शविली.
- शैलेश बलकवडे, जिल्हा पोलिस अधीक्षक

कृत्रिम कुडांची उभारणी सुरू
महापालिकेकडून कृत्रिम जलकुंड तयार करण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात येईल, असे प्रशासक देशमुख यांनी स्पष्ट केले. त्यानंतर तातडीने जुना सांगली निरामय रिंग रोडवर कृत्रिम जलकुंड उभारण्याचे काम सुरू झाले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90470 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..