शांतिसागर महाराजांची आज पुण्यतिथी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शांतिसागर महाराजांची आज पुण्यतिथी
शांतिसागर महाराजांची आज पुण्यतिथी

शांतिसागर महाराजांची आज पुण्यतिथी

sakal_logo
By

शांतिसागर महाराजांचा
आज पुण्यतिथी कार्यक्रम

दानोळी : दक्षिण भारत जैन सभेच्या वीर सेवा दल मध्यवर्ती समितीतर्फे प्रथमाचार्य शांतिसागर महाराज यांचा ६७ वा पुण्यतिथी महोत्सव हिंगणगाव
(ता. कवठेमहांकाळ) येथे सोमवारी (ता. २९) आहे. १०८ आचार्य जिनसेन महाराज, स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक महास्वामी व स्वस्तिश्री लक्ष्मीसेन महास्वामी यांचा सानिध्य लाभणार आहे. सकाळी शांतिद्विप प्रज्वलन, विश्वशांति प्रार्थना, अंतिम आदेश उपदेशाचा स्वाध्याय, पुण्यतिथीनिमित्त सकाळी १० वाजता अहिंसा, शाकाहार, व्यसनमुक्ती, राष्ट्रीय एकात्मता, शांतिसद्भावना रॅलीचा प्रारंभ सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. मंताडाराजा दयानिधी यांच्या हस्ते होईल.
प्रमुख पाहुणे सांगलीचे पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, तहसीलदार बी. जी. गोरे, पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे, रोहित आर. पाटील उपस्थित राहातील. मुख्य समारंभ दुपारी दीड वाजता शालेय प्रांगणात होणार असून नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान होईल. समारंभाचे अध्यक्ष द. भा. जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील तसेच स्वागताध्यक्ष वीर सेवा दलाचे चेअरमन बाळासाहेब पाटील आहेत. कामगारमंत्री डॉ. सुरेश खाडे, खासदार संजयकाका पाटील, राजू शेट्टी, आमदार जयंतराव पाटील, आमदार प्रकाश आवाडे, आमदार विश्वजीत कदम, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार सुमन पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार अभय पाटील, आमदार श्रीमंत पाटील आदी उपस्थित राहतील.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90542 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..