‘व्यंकटेश’मध्ये उद्योजकांशी संवाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘व्यंकटेश’मध्ये उद्योजकांशी संवाद
‘व्यंकटेश’मध्ये उद्योजकांशी संवाद

‘व्यंकटेश’मध्ये उद्योजकांशी संवाद

sakal_logo
By

45711
-----------
‘व्यंकटेश’मध्ये उद्योजकांशी संवाद
इचलकरंजी, ता. २६ : उद्योगधंद्यांमध्ये येणारे आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करत उद्योगधंद्यांत वाढ केली तरच उद्योगधंदे टिकू शकतात. मानवी कौशल्याचे योग्य व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, ग्राहकांचे समाधान व वित्तीय व्यवस्थापन योग्य प्रकारे केल्यास निश्चितच भारतीय उद्योग व्यवसाय जगभरामध्ये वेगळे स्थान निर्माण करेल, असे प्रतिपादन कोल्हापूरमधील प्रसिद्ध उद्योजक एम. बी. शेख यांनी केले. ते व्यंकटेश महाविद्यालयांमध्ये लक्षवेध विभाग आणि माजी विद्यार्थी संघटना यांच्याद्वारे आयोजित ‘प्रतिथयश उद्योजकांशी संवाद’ कार्यक्रमादरम्यान बोलत होते.
विद्यार्थी व यशस्वी उद्योजक यांच्यामध्ये संवाद घडवून नवीन उद्योजक तयार करण्यासाठी परिसंवादाचे आयोजन केले होते. चितळे उद्योग समूहाचे एम. डी. चितळे म्हणाले, ‘‘एखाद्या उद्योजकाने आपल्यासोबत असलेल्या व्यक्तींना यशस्वी उद्योजक बनवण्याचे लक्ष्य ठेवले पाहिजे. उद्योजकाने बाजारपेठ व आपल्या परिसराची गरज काय आहे, याचा विचार करून उद्योग निर्माण केल्यास आपण यशस्वी उद्योजक होऊ शकतो.’’ कार्यक्रमामध्ये महाविद्यालयाच्या दुसऱ्या ‘व्यंकटेश बुलेटीन’चे प्रकाशन केले. प्रा. डॉ. व्ही. ए. माने यांनी प्रास्ताविक केले. एन. एम. मुजावर, एस. एन. जरंडीकर, श्रीनिवास बोहरा, बाबासाहेब वडिंगे, भालचंद्र ठिगळे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90551 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..