दिव्यांगांना निधीची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिव्यांगांना निधीची मागणी
दिव्यांगांना निधीची मागणी

दिव्यांगांना निधीची मागणी

sakal_logo
By

सिद्धी बुबणेचा गौरव
इचलकरंजी : नांदणी (ता. शिरोळ) येथील सिद्धी बुबणेने बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेमध्ये अचूक उत्तर देऊन विश्वनाथन आनंद यांच्याहस्ते बक्षीस प्राप्त केले. महाबलीपूरम (चेन्नई) येथे सुरू असलेली बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा पाहण्यासाठी, तसेच ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद यांच्याशी संवाद साधण्यासाठी विविध राज्यांतील खेळाडूंची निवड केली होती. स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या तीनशे खेळाडूंशी विश्वनाथन आनंद यांनी संवाद साधला. खेळातील बारकावे, पटावरील विविध परिस्थितीत अचूकपणे निर्णय घेण्याची कला, तसेच विविध कौशल्यांबाबत मार्गदर्शन केले.
---------------
दिव्यांगांना निधीची मागणी
इचलकरंजी : दिव्यांग व्यक्तींना पाच टक्के निधी मिळावा, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण दिव्यांग सेनेतर्फे उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांना निवेदन दिले. निवेदनात शासनाच्या जी. आर.प्रमाणे दरवर्षी दिव्यांग व्यक्तींना महापालिकेच्या करातील पाच टक्के निधी देण्याची तरतूद आहे. वाढत्या महागाईमुळे दिव्यांगाचे होणारे हाल पाहता २०२१-२२ मधील फरक व २०२२-२३ मधील निधी मिळावा, असे नमूद केले आहे. शिष्टमंडळात दिलीप जाधव, संदीप भगत, रवी गोंदकर, प्रताप पाटील, शहाजी भोसले, मनोहर जोशी आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90553 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..