आयर्न मॅन मोरेंचे मिरवणुकीने स्वागत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयर्न मॅन मोरेंचे मिरवणुकीने स्वागत
आयर्न मॅन मोरेंचे मिरवणुकीने स्वागत

आयर्न मॅन मोरेंचे मिरवणुकीने स्वागत

sakal_logo
By

45831
----------------------------------------------------------------------

आयर्न मॅन मोरेंचे मिरवणुकीने स्वागत
---
नागरिकांसह चाहत्यांची गर्दी; गडहिंग्लजकरांतर्फे मोरेंचा नागरी सत्कार
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २६ : डेन्मार्क येथे झालेल्या अतिशय खडतर आणि तितक्याच मानाच्या स्पर्धेत आयर्न मॅनच्या किताबावर नाव कोरणाऱ्‍या उद्योजक प्रकाश मोरे यांचे गडहिंग्लजला जल्लोषी मिरवणुकीने स्वागत झाले. दरम्यान, पालिकेच्या शाहू सभागृहात गडहिंग्लजकरांतर्फे झालेल्या नागरी सत्काराने श्री. मोरे व कुटुंबीय भारावून गेले.
जलतरण, सायकलिंग व धावणे हे तिन्ही क्रीडा प्रकार क्रमाने श्री. मोरे यांनी १४ तास सहा मिनिटांत पूर्ण करून आयर्न मॅनचा किताब पटकावत गडहिंग्लजचा झेंडा सातासमुद्रापार फडकावला. विजयानंतर आज त्यांचे शहरात आगमन झाले. मार्केट यार्डपासून सजविलेल्या उघड्या जीपमधून त्यांची मिरवणूक सुरू झाली. हलगी आणि कैचाळ वाद्यांच्या गजरात शहरातील प्रमुख मार्गांवरून फिरून या मिरवणुकीची सांगता पालिका आवारात झाली. मिरवणुकीत राष्ट्रीय छात्र सेनेचे (एनसीसी) विद्यार्थी, विविध मान्यवर, माजी-माजी नगरसेवक, सर्वपक्षीय कार्यकर्ते, माजी सैनिक, तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांचा सहभाग होता. मिरवणूक मार्गात ठिकठिकाणी त्यांचे स्वागत झाले. फटाक्यांची आतषबाजी झाली.
मिरवणुकीनंतर श्री. मोरे यांचा गडहिंग्लजकरांतर्फे पालिकेच्या सभागृहात नागरी सत्कार झाला. प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्या हस्ते श्री. मोरे, पत्नी सौ. स्मिता व आई श्रीमती लीलाबाई यांचा संयुक्तपणे नागरी सत्कार झाला. यानंतर सर्वपक्षीयांसह विविध सामाजिक संघटना, तरुण मंडळे व मान्यवरांनी श्री. मोरे यांचा गौरव केला. या सत्काराने मोरे कुटुंबीय भारावून गेले. राजेंद्र गड्ड्यान्नावर यांनी स्वागत केले. महेश ऊर्फ बंटी कोरी यांनी प्रास्ताविक केले. अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे, राजशेखर यरटे, जे. बी. बारदेस्कर, किसनराव कुराडे, सतीश पाटील, शिवाजी भुकेले, राजेंद्र तारळे, सुनील शिंत्रे, नागेश चौगुले यांची भाषणे झाली. श्री. मोरे यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. प्रा. रफिक पटेल यांनी सूत्रसंचालन केले. संपत सावंत यांनी आभार मानले. व्यासपीठावर बाळासाहेब मोरे, विष्णू केसरकर, शारदा आजरी, राजू पट्टणशेट्ठी, संतोष चिक्कोडे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90564 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..