आगमन मिरवणुकीचा आज ड्रॉ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आगमन मिरवणुकीचा आज ड्रॉ
आगमन मिरवणुकीचा आज ड्रॉ

आगमन मिरवणुकीचा आज ड्रॉ

sakal_logo
By

आगमन मिरवणुकीला परवाना सक्तीचा...
‘ड्रॉ’ आज; तीस मंडळे सहभागी होण्याची शक्यता; निर्देशाचे पालन बंधनकारक

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २६ ः राजारामपुरीतील गणेश आगमन मिरवणुकीसाठीचा ड्रॉ उद्या (ता. २७) काढण्यात येणार आहे. पोलिस आणि महापालिकेचा परवाना घेतलेल्याच मंडळांना संधी दिली जाणार आहे. मिरवणुकीत सर्व मंडळाना न्यायालय आणि शासनाने घालून दिलेल्या निर्देशाचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे.
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. तसे संपूर्ण शहर परिसराचे लक्ष राजारामपुरीतील गणेश आगमन मिरवणुकीकडे लागून राहिले आहे. या मिरवणुकीत दणदणाट झाला की संपूर्ण उत्सवात दणदणाट होतो, अशी मानसिकता तयार झाली आहे. कोरोना संकटामुळे दोन वर्षे ही मिरवणूक झाली नव्हती. यंदा उत्सवावरील निर्बंध हटविण्यात आले आहेत. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याची तयारी गणेश मंडळांकडून सुरू आहे. त्याचबरोबर पोलिस प्रशासनानेही बंदोबस्ताची तयारी सुरू केली आहे.
राजारामपुरीतील गणेश आगमन मिरवणुकीसाठी पहिल्यांदाच ड्रॉ काढून मंडळांना त्या त्या क्रमांकानुसार प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे भागातील सर्वच मंडळांना मिरवणुकीत सहभागी होण्याची समान संधी मिळणार आहे. ड्रॉ साठी सुरुवातीला ३७ मंडळांनी पसंती दर्शवली. त्यानंतर पाच मंडळांनी माघार घेतली. उर्वरित मंडळापैकी १२ ते १४ मंडळांनी महापालिका आणि पोलिसांचा परवाना अद्याप घेतलेला नाही. त्यांना आजच्या दिवसाची शेवटची संधी दिली आहे. ज्या मंडळाचा परवाना नाही त्यांना मिरवणुकीत कोणत्याही परिस्थितीत प्रवेश दिला जणार नाही. उद्या हा ड्रॉ काढण्यात येणार आहे. त्यानुसार प्रत्येक मंडळाने मिरवणूक मार्गावर किधी यायचे याचे राजारामपुरी पोलिसांकडून नियोजन केले जाणार आहे.

चौकट
निर्देशाचे पालन बंधनकारक
आगमन मिरवणुकीत ड्रॉ नुसारच प्रवेश दिला जाणार आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक मंडळाला विद्युत रोषणाई, डेकोरेशन यांची लांबी रुंदी किती ठेवायची हे ठरवून दिले आहे. त्यांना ध्वनी मर्यादेबाबतच्या निर्देशाचे आणि मिरवणूक मार्गावर ठरवून दिलेल्या वेळेचे पालनही करणे बंधनककारक असणार आहे.

चौकट
हा आहे उद्देश
यापूर्वीच्या मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांचे परवाने तपासले जात नव्हते. मात्र, यंदा हा परवाना सक्तीचा केला आहे. यामुळे मंडळाच्या कार्यकारिणीची नावे, पत्ते याची माहिती सहज उपलब्ध होते. जेणेकरून एखाद्या मंडळांने ध्वनी मर्यादेचे अगर पोलिसांच्या सूचनांचे उल्लंघन केल्यास संबधितांवर कारवाई करणे सोपे व्हावे, हा त्यामागीचा उद्देश असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90580 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..