‘कथानुभूती’ला रसिकांची दाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘कथानुभूती’ला रसिकांची दाद
‘कथानुभूती’ला रसिकांची दाद

‘कथानुभूती’ला रसिकांची दाद

sakal_logo
By

45769

‘कथानुभूती’ला रसिकांची दाद
कथ्थक नृत्याचा आविष्कार ः पारंपरिक कथा नृत्यकलेतून सादर

इचलकरंजी, ता. २६ ः शास्त्रीय नृत्यशैलीच्या उत्तर भारतीय कथ्थक नृत्यामधील वेगवेगळे प्रकार आणि पारंपरिक कथांचा नृत्यामधून मनाला भिडणारा अनुभव देणारा ‘कथानुभूती’ हा कार्यक्रम येथे झाला. प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना नीलिमा हिरवे (पुणे) आणि सहकलाकारांनी सादर केलेला हा कार्यक्रम उपस्थित रसिकांचा प्रतिसाद मिळवणारा ठरला.
येथील पदन्यास नृत्यकला अकादमी आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल ॲनस् कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला. सुरवातीला त्यांनी रामवंदना सादर केली. यावेळी त्यांनी काही बंदिशी, नटवरी बोल, परण, तत्कार, तीन ताल, आमद, तोडे, गिरकी, असे कथ्थक नृत्यप्रकार तालबद्धपणे सादर केले. नृत्यामधील गतभाव सादर करताना केवळ वाद्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कालियामर्दन, सीताहरण, जटायू युद्ध अशा पारंपरिक कथांचा नृत्यकलेमधून सुंदर अनुभव दिला. याबरोबरच गणेशवंदना, दूर्गास्तुती, भजन यावरील मनोवेधक नृत्याविष्कार हिरवे यांनी सादर केले.
नृत्य कार्यक्रम सादरीकरणासाठी वेदांग जोशी - तबला, देवेंद्र देशपांडे - हार्मोनियम, प्रफुल्ल सोनकांबळे - गायन आणि सृष्टी हिरवे - पढंत यांनी साथसंगत केली. संयोजन पराग हिरवे व तांत्रिक सहाय्य ऋतुजा जोशी यांनी केले. अशोक जैन यांनी मनोगत व्यक्त केले. संजय होगाडे यांनी प्रास्ताविक केले. संतोष आबाळे यांनी परिचय करून दिला. श्रीकांत राठी, नृत्यशिक्षिका सायली होगाडे व ज्योती सांगले, सचिन चौधरी यांच्या हस्ते कलाकारांचे स्वागत केले. येथील रोटरी श्री दगडूलाल मर्दा मानव सेवा केंद्र सभागृहात हा कार्यक्रम झाला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90623 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..