बॅंकांच्या व्यवस्थापकांना प्रशिक्षण द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बॅंकांच्या व्यवस्थापकांना प्रशिक्षण द्या
बॅंकांच्या व्यवस्थापकांना प्रशिक्षण द्या

बॅंकांच्या व्यवस्थापकांना प्रशिक्षण द्या

sakal_logo
By

45779
--------------------------
बॅंकांच्या व्यवस्थापकांना प्रशिक्षण द्या
चंदगडला नवउद्योजकांचे प्रशासनाला खडे बोल, तासभरात शिबिर गुंडाळले
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. २६ ः जिल्हाधिकारी कार्यालय व इतर शासकीय विभागातर्फे आज येथे आयोजित केलेल्या उद्योजक व नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमात उद्योग करू इच्छिणाऱ्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. कागदपत्रांची पूर्तता करून बॅंकेकडे कर्ज मागणीसाठी गेल्यावर बॅंक व्यवस्थापक त्याला खोडा घालतात. उद्योजक बनण्याची स्वप्ने दाखवण्याआधी प्रशासनाने या बॅंकांच्या व्यवस्थापकांना प्रशिक्षण द्यावे, असे खडे बोल सुनावले. अनुभवातून शहाणपण आलेल्या तरुणांनी मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांचीच झडती घेतली. तासभरात हे शिबिर गुंडाळले.
तहसीलदार विनोद रणावरे, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांच्यासह शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी मार्गदर्शनासाठी उपस्थित होते. मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात उद्योगांसाठी मार्गदर्शन आणि अर्थपुरवठा करणाऱ्या विविध खात्यांचे स्टॉल्स मांडले होते. प्रारंभी अधिकाऱ्यांनी या स्टॉलची पाहणी केली. त्यानंतर उपस्थितांनी प्रत्येक स्टॉलवर जाऊन माहिती घ्यावी, असे सांगितले. त्यावेळी उपस्थितांनी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. आम्हाला उद्योजक बनण्याचे स्वप्न दाखवताय, परंतु अर्थपुरवठा करणाऱ्या बॅंकातून स्वप्नावर पाणी फिरवले जाते. प्रथम या अधिकाऱ्यांची मानसिकता सकारात्मक करा. परराज्यातील व्यवस्थापकांना येथील भाषा कळत नाही, माणूस कळत नाही, असे अधिकारी प्रथम बदला. स्थानिक अधिकाऱ्यांची नियुक्ती करा, असे सुचवले. शासनाकडून प्रत्येक बॅंकेला कर्जपुरवठ्यासाठी उद्दिष्ट दिले जाते. त्याच्या पूर्तीबाबत वरिष्ठांकडून माहिती घेतली जात नाही का, असा प्रश्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रा. दीपक पाटील यांनी केला. त्यावर दर महिन्याला अशा प्रकारची माहिती घेतली जात असल्याचे आर्थिक साक्षरता समुपदेशक उदयकुमार जोशी यांनी सांगितले. उपस्थितांची आक्रमकता पाहून तहसीलदार रणावरे बैठकीतून बाहेर गेले. त्यानंतर सभागृहात बराच काळ गोंधळ होता. प्रत्येकजण आपली व्यथा मांडत होता. अनेकजण आपली कागदपत्रांची फाईल घेऊनच सभागृहात आले होते. मालमत्ता नावावर नाही, जमीन बिगरशेती नाही, अशी विविध कारणे देऊन बॅंकांकडून कर्जाला नकार दिला जातो. मोठ्या कष्टाने कागदपत्रांची जुळणी करूनही अधिकाऱ्यांची मानसिकता नवउद्योजकाच्या मनात नकारात्मकता निर्माण करीत असल्याचे सांगण्यात आले. शेळीपालनसारखा व्यवसाय वर्षानुवर्षे करूनही तो वाढवण्याच्या दृष्टीने बॅंकेकडे मागणी केली असता सहकार्य मिळत नसल्याचे कोरज येथील कुबल यांनी सांगितले. चंद्रशेखर गावडे, अमित शिरोळकर, मोहन परब, रवी नाईक, मधुकर सडेकर, नंदकुमार कांबळे, सुरेश बागीलगेकर यांच्यासह तालुक्याच्या विविध भागांतून शेकडो तरुण उपस्थित होते.
-------
अपेक्षित मार्गदर्शन नाही
तहसीलदारांनी लोकांपर्यंत पोहोचवलेल्या बातमीनुसार जिल्हाधिकारी येणार म्हणून अनेक जण आले होते. ते आले नाहीत. प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनीही हजेरी न लावल्याने अनेकांचा हिरमोड झाला. शिबिरात अपेक्षित मार्गदर्शन झालेच नाही. केवळ माहितीपत्रकांची भेंडाळी घेऊन घरी परतावे लागले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90637 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..