रवळनाथला प्रशासनाचे सर्वतोपरी सहकार्य; प्रांताधिकारी वाघमोडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रवळनाथला प्रशासनाचे सर्वतोपरी सहकार्य; प्रांताधिकारी वाघमोडे
रवळनाथला प्रशासनाचे सर्वतोपरी सहकार्य; प्रांताधिकारी वाघमोडे

रवळनाथला प्रशासनाचे सर्वतोपरी सहकार्य; प्रांताधिकारी वाघमोडे

sakal_logo
By

45785
चंदगड : वसंत पेडणेकर यांचा सत्कार करताना प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे. शेजारी तहसीलदार विनोद रणावरे, संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले, उपाध्यक्ष व्ही. के. मायदेव आदी.

रवळनाथला प्रशासनाचे सर्वतोपरी
सहकार्य : प्रांताधिकारी वाघमोडे
चंदगडला निवृत्त सभासद, पाल्यांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. २९ : स्थापनेपासून सामाजिक बांधिलकी जोपासलेल्या रवळनाथ हौसिंग फायनान्स सहकारी क्षेत्रात नवा मानदंड निर्माण केला आहे. त्यांच्या देशभरातील शाखा विस्तारात गडहिंग्लज विभागातील नागरिकांनी सक्रिय हातभार लावावा. या कामी प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करील, असे आश्‍वासन प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी दिले. संस्थेच्या येथील शाखेचे निवृत्त सभासद, गुणवंत पाल्यांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष मलाप्पा चौगुले होते. तहसीलदार विनोद रणावरे प्रमुख उपस्थित होते.
शाखा अध्यक्षा पुष्पा नेसरीकर यांनी स्वागत केले. संस्थापक चौगुले यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. सभासद, ठेवीदार, कर्जदार व ग्राहकांच्या विश्‍वासावर संस्थेची चौफेर प्रगती झाली असल्याचे सांगितले. निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी एम. टी. कांबळे, राजेश घोरपडे यांनीही मनोगते व्यक्त केली. या गुणवंत पाल्य गायत्री गावडे, आदिती घोरपडे, अक्षय कोकीतकर, निवृत्त सभासद एम. टी. कांबळे, नारायण सुतार, वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केलेले वसंत पेडणेकर, रोहिणी देशपांडे यांचा सत्कार झाला. उपाध्यक्ष व्ही. के. मायदेव, नारायण काणेकर, चंद्रकांत दुगाणी, जयवंत कोकीतकर, सविता चौगुले, संपदा चौगुले, शाखाधिकारी दीपक शिंदे उपस्थित होते. प्रा. डॉ. राजाराम साळुंखे यांनी सूत्रसंचालन केले. संचालिका रेखा पोतदार यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90661 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..