इचल : कृत्रीम जलकुंड तयारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचल : कृत्रीम जलकुंड तयारी
इचल : कृत्रीम जलकुंड तयारी

इचल : कृत्रीम जलकुंड तयारी

sakal_logo
By

४५७९४

महापालिका यंत्रणा गतिमान
पर्यावरणपूरक विसर्जन; इचलकरंजीत कृत्रिम जलकुंड उभारणीस प्रारंभ
इचलकरंजी, ता. २६ ः पर्यावरणपूरक गणेश मूर्तींचे विसर्जन करण्याचा निर्णय झाल्यानंतर इचलकरंजी महापालिकेची यंत्रणा गतीने कामाला लागली आहे. शेततळ्याप्रमाणे शहरात पाच कृत्रिम जलकुंड उभारण्याची युद्धपातळीवर प्रक्रिय सुरू केली आहे. तर घरगुती गणेश मूर्ती विसर्जनासाठी तब्बल ७२ ठिकाणी कृत्रिम जलकुंडाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. याबाबतचा आढावा आज प्रशासक सुधाकर देशमुख यांनी घेतला.
महापालिकेत गुरुवारी प्रशासनाच्या व्यापक बैठकीत पर्यावरणपूरक गणेश मूर्ती विसर्जन करण्याचा निर्णय झाला. त्यासाठी पालिकेच्या माध्यमातून आवश्यक यंत्रणा उभा करण्याचे ठरले होते. त्यानुसार महापालिकेची यंत्रणा गतीने कामाला लागली आहे. नदी मार्गावर शेततळ्याप्रमाणे दोन मोठे कृत्रिम जलकुंडांची उभारणी केली जाणार आहे. या ठिकाणी मोठ्या गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. निरामय रिंग रोडवर दोन जुळ्या जलकुंडांची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या ठिकाणी पाच ते सहा फूट उंचीच्या मूर्तींचे विसर्जन करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. या शिवाय प्रांत कार्यालय परिसरात घरगुती गणेश मूर्ती विसर्जनाची सोय केली जाणार आहे. या सर्व ठिकाणी प्रत्यक्षात यंत्रणा सक्रिय झाली आहे. जेसीबीच्या साहाय्याने कृत्रिम जलकुंभ उभारणी केली जाणार आहे. घरगुती मूर्ती विसर्जनासाठी शहरातील विविध ७२ भागांत कृत्रिम जलकुंड ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय मूर्ती दान उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. त्याचे नियोजन आज महापालिकेकडून करण्यात आले. पंचगंगा नदीमध्ये मूर्ती विसर्जन होणार नाही, याबाबतची दक्षता महापालिका प्रशासनाकडून घेण्यात येत आहे.


शहापूर खाणीची स्वच्छता
शहापूर खाणीतील बहुतांशी जलपर्णी काढली आहे. दहा टन तुरटी व ब्लिचिंग पावडरचा वापर करून पाण्याची शुद्धीकरण प्रक्रिया राबविण्यात येत आहे. एडीएटरच्या साहाय्याने पाण्याची ऑक्सिजन पातळी वाढविण्यात येत आहे. परिसराचीही स्वच्छता केली जाणार आहे. या ठिकाणी गणेश मूर्ती विसर्जनाचा खुला पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90680 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..