इकोफ्रेंडली बाप्पा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इकोफ्रेंडली बाप्पा
इकोफ्रेंडली बाप्पा

इकोफ्रेंडली बाप्पा

sakal_logo
By

(मंगळवारच्या टुडेएकवरून लोगो व गणेशमूर्ती फोटो घेणे)

इकोफ्रेंडली गणपती कार्यशाळा उद्या
डीवायपी सिटी मॉल मुख्य प्रायोजक, माधव मिशन सहप्रायोजक

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २६ : शालेय विद्यार्थ्यांतील कलात्मक गुणांना वाव देण्याबरोबरच त्यांच्यातील पर्यावरणविषयक जाणिवा समृद्ध करण्यासाठी सकाळ माध्यम समूहाच्या न्यूजपेपर इन एज्युकेशन-‘एनआयई’तर्फे रविवारी (ता. २८) इकोफ्रेंडली गणपती कार्यशाळा होणार आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव कसा साजरा करावा?, याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली जाणार आहे. त्याशिवाय सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
दरम्यान, डीवायपी सिटी मॉलमध्ये सकाळी आठ ते साडेअकरा या वेळेत ही कार्यशाळा होणार असून, शालेय विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रवेश असेल.
डीवायपी सिटी प्रस्तुत या कार्यशाळेसाठी माधव मिशन सहप्रायोजक आहेत. आठ ते पंधरा वयोगटांतील विद्यार्थ्यांसाठी ही कार्यशाळा आहे. कार्यशाळेत विद्यार्थ्यांना गणेशमूर्ती कशी बनवावी?, याचे प्रात्यक्षिक दळवीज् आर्टस इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी देणार असून, विद्यार्थ्यांना स्वतःच्या हातांनी मूर्ती साकारायची आहे. त्यासाठी माती व इतर साहित्य विद्यार्थ्यांना पुरवले जाणार असून, पट्टी, आईस्क्रिम काडी, पाणी बॉटल, लहान पॅड किंवा बोर्ड, हात पुसण्यासाठी कापड, टूथ स्टीक आदी साहित्य विद्यार्थ्यांनी आणायचे आहे. दरम्यान, यापूर्वी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनाच कार्यशाळेसाठी प्रवेश असेल.

कोट
४५८०७
गणेशोत्सव म्हणजे चैतन्याचा सोहळा. लहान मुलांचे बाप्पांसोबत असलेले भावनिक नाते पर्यावरण जागृतीचा संदेश देत अधिक मजबूत करण्यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे. डीवायपी सिटी मॉल अशा उपक्रमात नेहमीच सक्रिय असून, कार्यशाळेच्या माध्यमातून मुलांच्या सृजनशीलतेबरोबरच पर्यावरणही जपूया.
- आमदार ऋतुराज पाटील,
विश्‍वस्त, डॉ. डी. वाय. पाटील ग्रुप

८९४८४
शून्य ते अठरा वयोगटांतील मुलांचे स्वास्थ उत्‍तम राहिले तर त्यांच्या आयुष्याची सायंकाळही सुखकर होत असते. त्यामुळे या वयातच त्यांच्या जाणिवा अधिक समृद्ध झाल्या पाहिजेत. आपली परंपरा आणि संस्कृती जपतानाच या जाणिवा अधिक प्रगल्भ करण्यासाठी इकोफ्रेंडली गणपती कार्यशाळा महत्त्‍वाची ठरणार आहे.
- डॉ. आशुतोष देशपांडे, माधव मिशन

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90681 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..