मनपा शाळा बदली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मनपा शाळा बदली
मनपा शाळा बदली

मनपा शाळा बदली

sakal_logo
By

पटसंख्या जास्त असलेल्या शाळांत
शिक्षक कमी असल्याचा प्रकार

माधुरी लाड यांचे प्रशासकांना निवेदन

कोल्हापूर, ता. २६ ः महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळाने राबवलेल्या बदली प्रक्रियेनंतर ज्या शाळात पटसंख्या जास्त तिथे शिक्षक कमी असा प्रकार झाला आहे. चांगल्या केलेल्या शाळांमध्ये झालेल्या या प्रकाराने पालकांत संभ्रमावस्था झाली आहे. मागणी करूनही शिक्षक मिळत नसल्याचे निवेदन माजी नगरसेविका माधुरी लाड यांनी प्रशासकांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, लाईन बाजारमधील भाऊसो महागावकर शाळेत १४० तर कसबा बावड्यातील राजर्षी शाहू विद्यालयात १६४ पटसंख्या जास्त आहे. तिथे अनुक्रमे चार व सहा शिक्षक आहेत. उलट वि. स. खांडेकर शाळेत ४० पटसंख्या असून, ७ शिक्षक आहेत. आम्ही देणगीदारांकडून संगणक, टीव्ही, रंगरंगोटी, बेंच, बोर्ड आदी साहित्य शाळेला मिळवून दिले आहेत. आता शिक्षक अपुरे असल्याने पालक आपल्या पाल्यांना दुसऱ्या शाळेत घालण्याचा विचार करत आहेत. त्यामुळे शिक्षकांची व्यवस्थित नेमणूक व्हावी, अशी मागणी केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90753 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..