नीतीप्रज्ञ पुरस्कार प्रदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नीतीप्रज्ञ पुरस्कार प्रदान
नीतीप्रज्ञ पुरस्कार प्रदान

नीतीप्रज्ञ पुरस्कार प्रदान

sakal_logo
By

45850
कोल्हापूर : धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ॲड. प्रशांत चिटणीस यांना पुरस्कार प्रदान करताना उपस्थित मान्यवर.

नीतीप्रज्ञ न्यायरक्षक पुरस्कार
ॲड. प्रशांत चिटणीस यांना प्रदान

कोल्हापूर, ता. २६ : धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ‘नीतीप्रज्ञ न्यायरक्षक पुरस्कार’ ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ, संविधानाचे अभ्यासक, जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. प्रशांत चिटणीस यांना प्रदान केला.
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोव्याचे माजी अध्यक्ष ॲड. महादेवराव आडगुळे, लातूर येथील ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ॲड. मंचकराव डोणे यांच्या हस्ते वितरण झाले. जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. प्रकाश मोरे अध्यक्षस्थानी होते. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोव्याचे उपाध्यक्ष ॲड. विवेकानंद घाटगे, जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गिरीश खडके, निर्मिती विचारमंचचे अध्यक्ष अनिल म्हमाने उपस्थित होते.
डॉ. दयानंद ठाणेकर, प्रा. डॉ. शोभा चाळके, अरहंत मिणचेकर, ॲड. अकबर मकानदार, ॲड. योगेश पाटील, ॲड. अतुल जाधव, ॲड. सचिन आवळे, ॲड. शैलजा चव्हाण, नंदकुमार गोंधळी, सोमनाथ घोडेराव, प्रशांत आवळे, विठ्ठल शालबीद्रे आदी उपस्थित होते. मुख्य निमंत्रक, धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा ॲड. करुणा विमल यांनी प्रास्ताविक केले. सनी गोंधळी यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90754 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..