इराणी खण पाहणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इराणी खण पाहणी
इराणी खण पाहणी

इराणी खण पाहणी

sakal_logo
By

45848

स्वयंचलित यंत्रणेचे काम
दोन सप्टेंबरपूर्वी पूर्ण करा

प्रशासक बलकवडे : इराणी खणीची केली पाहणी
कोल्हापूर, ता. २६ : इराणी खण येथील गणेशमूर्ती विसर्जनाच्या स्वयंचलित यंत्राच्या कामाची आज प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी पाहणी केली. या यंत्रणेचे काम दोन सप्टेंबरपूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना वर्कशॉप प्रमुख चेतन शिंदे यांना दिल्या. तसेच खणीमधील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी रंकाळ्यातील पाणी पंपाद्वारे सोडण्यात आले.
इराणी खणीमधील गाळ उन्हाळ्यात काढला आहे. त्यासाठी खण पूर्णपणे कोरडी केली होती. परिणामी तेथील पाण्याची पातळी कमी झाली आहे. गणेशमूर्ती विसर्जन तिथे करण्यात येणार असल्याने पाणी कमी पडत असल्याने ती पातळी वाढवण्यासाठी खणीमध्ये पंपाद्वारे रंकाळ्यातील स्वच्छ पाणी पंपाद्वारे सोडण्यात येत आहे. घरगुती व सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन इराणी खणीमध्ये स्वयंचलित यंत्राच्या साहाय्याने केले जाणार आहे. याची यंत्रणा बसविण्याचे सुरू असलेल्या कामाची प्रशासक डॉ. बलकवडे यांनी पाहणी केली. अतिरिक्त आुयक्त नितीन देसाई, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता एन. एस. पाटील, जयेश जाधव उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90762 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..