टीईटी घोटाळ्यात पाच शिक्षक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टीईटी घोटाळ्यात पाच शिक्षक
टीईटी घोटाळ्यात पाच शिक्षक

टीईटी घोटाळ्यात पाच शिक्षक

sakal_logo
By

टीईटी घोटाळ्यात पाच शिक्षक
सिंधुदुर्गात नोकरीला; वेतन थांबवण्याचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २६ ः शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) घोळ करून बोगस प्रमाणपत्र प्राप्त करणाऱ्या शिक्षकांची यादी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला आज मिळाली. त्यामध्ये जिल्ह्यातील पाच शिक्षकांचा समावेश आहे. संबंधित शिक्षकांची पात्रता नसताना टीईटी प्रमाणपत्र प्राप्त केल्यामुळे आता त्यांचे वेतन थांबवण्याची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
राज्य परीक्षा परिषदेच्या २०१९-२० मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल १९ जानेवारी २०२० ला जाहीर झाला होता. यात १६ हजार ५९२ उमेदवार पात्र ठरवण्यात आले होते. त्यातील ७ हजार ८०० उमेदवार अपात्र असताना त्यांच्याकडून हजारो रुपये घेऊन त्यांना पात्र ठरवण्यात आल्याचे समोर आले होते. त्यामुळे यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्ट झाले होते. याची चौकशी पुणे सायबर पोलिसांद्वारे करण्यात आली. राज्य शासनाने १३ फेब्रुवारी २०१३ नंतर अनुदानित अंशत: अनुदानित विनाअनुदानित शाळांमध्ये पाचवी ते आठवीपर्यंत रुजू शिक्षकांचे मूळ टीईटी उत्तीर्ण प्रमाणपत्राच्या पडताळणीचा निर्णय घेतला होता. राज्य परीक्षा परिषदेच्या अध्यक्षांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देत प्रमाणपत्र सादर करण्याचा आदेश दिला. त्यानुसार शिक्षण विभागाने प्रमाणपत्र जमा करण्याची प्रक्रिया राबवली. जिल्ह्यातूनही प्रमाणपत्रे पडताळणीसाठी पाठवण्यात आली. यापैकी नेमकी किती रद्द ठरली, याकडे शिक्षण विभागाचे लक्ष लागले होते. आता बोगस प्रमाणपत्र घेणाऱ्या पाच शिक्षकांची यादी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला मिळाली आहे. त्यामुळे संबंधितांचे वेतन थांबवण्यात येणार आहे.

ऑगस्टपासून वेतन रोखण्याचे आदेश
टीईटीतील गैरव्यवहार व त्या अनुषंगाने कारवाईबाबत शिक्षण संचालकांनी शिक्षणाधिकारी वेतन पथक अधीक्षकांना आदेश पाठवला आहे. अपात्र उमेदवारांचे शालार्थ आयडी गोठविण्यात आले असून त्यांना ऑगस्ट २०२२ पासून ऑनलाईन किंवा ऑफलाईन वेतन अदा होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आदेशात नमूद केले आहे. त्यांना वेतन अदा झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
-----------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90775 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..