नाट्यलेखन स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाट्यलेखन स्पर्धा
नाट्यलेखन स्पर्धा

नाट्यलेखन स्पर्धा

sakal_logo
By

नाट्य परिषदेतर्फेनाट्यलेखन स्पर्धेचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २६ ः अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोल्हापूर शाखेतर्फे मराठी नाट्य लेखन स्पर्धा आयोजित केली आहे.
पहिल्यांदाच नाट्यलेखन स्पर्धेसाठी मोठी बक्षीसे दिली जाणार असून, अनुक्रमे पंचवीस हजार, वीस हजार, पंधरा हजार आणि उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून अनुक्रमे दहा हजार, साडेसात हजार अशी बक्षीसे असतील. याबाबतची माहिती आज शाखेचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी, समन्वयक जितेंद्र देशपांडे, नाटककार हिमांशू स्मार्त यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मराठी रंगभूमीवर नवनवीन प्रयोग यावेत, ही अपेक्षा करताना चांगल्या संहिताही महत्वाच्या असतात. त्यामुळे नवीन लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा होत आहे. संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त ही स्पर्धा होणार असून, त्यात केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातील आणि देशाबाहेरीलही मराठी लेखक सहभागी होवू शकतात. नाटक दोन अंकी असणे आवश्यक असून, त्याचा कुठेही प्रयोग झालेला नसावा. प्रयोग परीनिरीक्षण मंडळाचे प्रमाणपत्र आवश्यक नाही. नाटकाच्या दोन प्रती लेखकाच्या सर्व माहितीसह पाठवायच्या असून, संहिता पाठवण्याची अंतिम तारीख पंधरा नोव्हेंबर आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90801 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..