मेडिकल असोसिएशन व्याख्यान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेडिकल असोसिएशन व्याख्यान
मेडिकल असोसिएशन व्याख्यान

मेडिकल असोसिएशन व्याख्यान

sakal_logo
By

४५८६८

मधुमेहापासून मुक्तीसाठी
आहारावर नियंत्रण ठेवा
डॉ. जगन्नाथ दीक्षित; केएमएतर्फे व्याख्यानमाला
सकाळ वृत्तसेवा 
कोल्हापूर ता. २७ : मधुमेहापासून मुक्ती मिळवायची आणि वजन कमी करायचे असेल आहारावर नियंत्रण ठेवा. जेवणाच्या वेळा सहसा बदलू नका. प्रोटिन वाढवा, ग्रीन सॅलड खा, शरीराला लागणारे प्रोटिन रोजच्या जीवनातून सहज मिळते, त्यासाठी वेगळे टॉनिक खायची गरज नाही, असा सल्ला मधुमेह तज्ज्ञ व आहारतज्ज्ञ प्रा. डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी दिला. कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या शताब्दी निमित्त आयोजित लोकप्रबोधन व्याख्यानमालेत ते बोलत होते.
डॉ. दीक्षित म्हणाले, ‘‘शरीरातील इन्शुरन्स लेवल नियमित करणे म्हणजे निरोगी राहणे होय. दोन वेळ खावा किंवा भूक लागली तर जेवा असे आयुर्वेदात आणि वात्सायानातही  सांगितले आहे. माणूस जिभेचा गुलाम झाला की त्याच्यात तोंडावर नियंत्रण राहत नाही आणि सुखकर आरोग्याचा प्रवास तेथेच खंडित होतो. भूक नसताना प्राणीही खाद्य खात नाहीत पण माणूस मात्र भरल्या पोटावर खात असतो ही विकृती आहे.’’
कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. गीता पिल्लाई यांनी प्रास्ताविक केले. प्रभारी अध्यक्षा डॉ. राधिका जोशी स्वागत केले. शताब्दीमहोत्सव समितीचे कार्यवाह डॉ. उद्धव पाटील यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. डॉ. अमर अडके यांनी सूत्रसंचालन केले.
समन्वयक डॉ. रवींद्र शिंदे, डॉ. किरण दोशी, डॉ. राजेंद्र वायचळ, डॉ. शैलेश कोरे, डॉ. अशोक जाधव, डॉ. संदीप साळोखे, डॉ. आनंद कामत, डॉ. पी. एम. चौगुले, डॉ. एन. वाय. जोशी, डॉ. सूर्यकांत मस्कर यांच्यासह डॉक्टर आणि नागरिक उपस्थित होते. डॉ. ए. बी. पाटील यांनी आभार मानले. कोल्हापूर प्रेस क्लब या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90807 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..