गणेशोत्सव मंडळाची कार्यकारिणी जाहिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशोत्सव मंडळाची कार्यकारिणी जाहिर
गणेशोत्सव मंडळाची कार्यकारिणी जाहिर

गणेशोत्सव मंडळाची कार्यकारिणी जाहिर

sakal_logo
By

45966
कोल्हापूर : महानगरपालिका आरोग्य विभाग सेवकांच्या पतसंस्थेतर्फे निवृत्त सभासदांचा सत्कार करताना उपस्थित सदस्य.

मनपा आरोग्य सेवक पतसंस्थेची सभा
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका आरोग्य विभाग सेवकांची सहकारी पतसंस्थेची ६५ वी वार्षिक साधारण सभा झाली. प्रारंभी दिवंगतांना श्रद्धांजली वाहिली. महापालिकेच्या सेवेतून निवृत्त झालेल्या सभासदांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष दिनकर आवळे, संचालक यांच्या हस्ते झाला. सहायक चिटणीस मोहन पाटील यांनी सभेची नोटीस, अहवाल वाचन करून हिशेबी पत्रके सादर केली. विषयानुसार झालेल्या चर्चेत सभासद मारुती दाभाडे, राजू अवघडे, नाना लोखंडे, सिकंदर सोनुले, सतीश डोंगरे, धीरज लोंढे, शामराव कवाळे आदींनी सहभाग घेतला. विषय पत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर केले. उपाध्यक्ष कृष्णात रूईकर यांनी संस्थेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. श्री. आवळे यांनी सभासदांना १४ टक्के लाभांश जाहीर केला. सभासदांतर्फे अध्यक्ष, उपाध्यक्षांचा सत्कार केला. श्री. रूईकर यांनी आभार मानले.

03117
तळसंदे : एस. एम. शिराळकर यांच्या ‘काव्यांजली’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन करताना दि. बा. पाटील, आप्पासाहेब खोत, डॉ. श्रीकांत पाटील, शरद महाजन, प्रा. अण्णासाहेब पाटील, रूपाली पाटील आदी.

काव्यांजली काव्यसंग्रहाचे प्रकाशन
वारणानगर : साहित्यिकांच्या मांदियाळीत सेवानिवृत्त मुख्याध्यापक एस. एम. शिराळकर यांच्या ‘काव्यांजली’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन वारणा खोऱ्यातील साहित्यिक दि. बा. पाटील, प्रा. आप्पासाहेब खोत, डॉ. श्रीकांत पाटील आदींच्या उपस्थितीत झाले. कोडोली (ता. पन्हाळा) येथील निवृत्त मुख्याध्यापक एस. एम. शिराळकर यांच्या ‘काव्यांजली’ काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा तळसंदे येथील शामराव पाटील शिक्षण समूहातर्फे झाला. संस्थेच्या अध्यक्षा रूपाली पाटील यांनी प्रास्ताविक केले. साहित्यिक दि. बा. पाटील म्हणाले, ‘शिराळकर सरांनी वयाच्या ७७ व्या वर्षी लिहिलेली ‘काव्यांजली’ हे सर्वांग सुंदर असे काव्य शिल्प आहे. लेखक एस. एम. शिराळकर म्हणाले, ‘आयुष्यात माणसं मिळविली. वाचनासह लिहिण्याच्या छंदातून लिहिता झालो. ‘सकाळ’चे बातमीदार संजय पाटील यांना आचार्य अत्रे सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार झाला. सरपंच गायत्री पाटील, राहुल पाटील, शरद महाजन, दिलीप पाटील, डॉ. अभिजित शिराळकर, अर्चना शिराळकर, संजय दळवी उपस्थित होते. प्रा. व्ही. एन. शेजूळ यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. बी. आर. चव्हाण यांनी आभार मानले.

सुशांत पोवार अध्यक्षपदी
कोल्हापूर : बालगोपाल तालीम मंडळाची गणेश उत्सवाची सभा तालमीचे अध्यक्ष राजेंद्र कुरणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सुशांत पोवार यांची उत्सव समिती अध्यक्षपदी, रोहित चौगुले यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. ओंकार हुक्केरी सचिवपदी, कुणाल पाटील खजानिसपदी निवड केली. तालमीचे कार्याध्यक्ष निवास शिंदे, आप्पासाहेब साळोखे, राहुल चव्हाण, संजय साळोखे, अशोक पोवार, तालमीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

00633 आयुष मस्कर
00632 धनाजी कांबळे

अध्यक्षपदी आयुष मस्कर
प्रयाग चिखली ः रजपूतवाडी (ता. करवीर) येथील अष्टविनायक तरुण मंडळाच्या अध्यक्षपदी आयुष धनाजी मस्कर व उपाध्यक्षपदी धनाजी आनंदा कांबळे यांची निवड झाली. अध्यक्षस्थानी माजी अध्यक्ष राहुल काशीद होते. यावेळी विशाल मस्कर, राजवर्धन मस्कर, अविनाश मस्कर, आकाश मस्कर, तन्मय मस्कर, महेश पाटील, राहुल काशीद, प्रल्हाद काशीद, सागर कुंभार, तुषार मस्कर, श्रेयस बैलकर, राजू जाधव, राजेंद्र वाणी, दत्तात्रय माने, सुरेश माने, ऋषिकेश स्वामी आदी उपस्थित होते.


45975
शशिकांत बिडकर यांची निवड
कोल्हापूर : शिवसेनेच्या जिल्हा झोपडपट्टी सेना जिल्हा संघटकपदी शशिकांत बिडकर यांची निवड झाली. जिल्हा शिवसेनेच्या झालेल्या बैठकीत जिल्हाप्रमुख संजय पवार, जिल्हा प्रमुख विजय देवणे, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निवडीचे पत्र दिले. यापूर्वी श्री. बिडकर यांनी विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपप्रमुख, तसेच शिवसेना शहर उपप्रमुख म्हणून काम केले. उत्तर विधानसभा मतदारसंघातील संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

03809
वासनोली पैकी जोगेवाडी (ता. भुदरगड) येथे शैक्षणिक साहित्य वाटपप्रसंगी शरद पाटील, डॉ. अर्जुन कुंभार, प्रकाश चौगले, संजय पाटील व अन्य.

जोगेवाडी शाळेत साहित्य वाटप
गारगोटी ः वासनोलीपैकी जोगेवाडी (ता. भुदरगड) येथे उद्योजक शरद पाटील व कुटुंबीयांनी शाळेतील गुणवंत, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, बूट, सॉक्स, वह्या, पुस्तके व खाऊ वाटप केले. वासनोलीसारख्या दुर्गम भागातील विद्यार्थी बिकट परिस्थितीवर मात करत चार किलोमीटर पायपीट करत शाळेत येतात. त्यांची गरज ओळखून शैक्षणिक साहित्य दिले. यावेळी विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर झाले. यावेळी डॉ. महेश भोसले यांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून मोफत औषधोपचार केले. प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक श्री. चौगले यांनी स्वागत केले. प्राचार्य प्रकाश चौगले, संजय पाटील, डॉ. महेश भोसले, पालक उपस्थित होते.


01288
वडणगे : नूतन भिडे हिला जीवनावश्यक वस्तूंची मदत देताना सुभाष ग्रुपचे कार्यकर्ते.
सुभाष ग्रुपतर्फे गरजूंना मदत
वडणगे : येथील सुभाष ग्रुपने समाजातील गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंची मदत देऊन स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला.
सरपंच सचिन चौगले यांच्या यशस्वी कारकिर्दीचा सन्मान म्हणून ग्रुपतर्फे ६ जूनपासून गरजूंना मदत हा उपक्रम सुरू केला आहे. आतापर्यंत ३०० लोकांना मदत दिली आहे. सुभाष ग्रुपतर्फे ३० वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, मुलींना सायकली व छत्र्या वाटप, रुग्णालय, शिक्षण आणि घरासाठी मदत, जीवनावश्यक वस्तू अशी मदत दिली आहे. दोन महिन्यांपासून विद्यार्थ्यांना शाळेत, घरी जाऊन साहित्य दिले. तसेच गरजू कुटुंबांनाही घरी जाऊन जीवनावश्यक वस्तू दिल्या. या वेळी सोसायटीचे संचालक निवास चौगले, माजी सभापती सुनील लांडगे, माजी उपसभापती राजेंद्र चौगले, अध्यक्ष प्रकाश उदाळे, उपाध्यक्ष विनोद सावंत, प्रवीण चौगले, सुरेश उदाळे, जितेंद्र सावंत, काशिनाथ उदाळे, अजित पोवार, समाधान सासणे, सागर चौगले, अथर्व चौगले, हर्षद चौगले आदी उपस्थित होते.

00629
प्रयाग चिखली ः येथील शाहू माळ परिसरात विकासकामांच्या उद्‌घाटनप्रसंगी रघू पाटील. शेजारी सचिन शिंदे, सलीम मुजावर, केवलसिंग रजपूत, राम जाधव आदी.

चिखलीत विकासकामाचे उद्‌घाटन
प्रयाग चिखली ः येथील शाहू माळ परिसरात आमदार पी. एन. पाटील यांच्या २० लाख रुपये फंडातून गणेश कॉलनी येथे आरसीसी गटर, तसेच हांडे गल्ली, देवडकर गल्ली, काटकर गल्ली, मोरे गल्ली येथील अंतर्गत काँक्रिटीकरण रस्त्यांचा प्रारंभ शंकर देवडकर व मान्यवर यांच्या हस्ते झाला.
येशू भोसले, सचिन शिंदे, मंदाताई कांबळे यांच्या प्रयत्नातून व शिवाजी कवठेकर, श्रीधर पाटील, रघुनाथ पाटील, संभाजी पाटील, केवलसिंग रजपूत, धनाजी चौगले, सरपंच सिकंदर मुजावर, अशोक हांडे, राहुल जाधव, राम जाधव, भरत मोरे, गणेश पाटील, नामदेव सुतार, वसंत सुतार, सतीश पाटील, अमित सुतार, केरबा सुतार, शंकर देवडकर, विकी देवडकर, नजीर जमादार, अरविंद कुलकर्णी, केरबा गायकवाड, बटुसिंग रजपूत, सर्जेराव शिपेकर, राजू पिसाळ, सलीम मुजावर, किरण वरुटे, ग्रामसेवक गिरीगोसावी आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90946 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..