शॉर्टफिल्म निकाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शॉर्टफिल्म निकाल
शॉर्टफिल्म निकाल

शॉर्टफिल्म निकाल

sakal_logo
By

राज्यस्तरीय शॉर्टफिल्म स्पर्धेत प्रथमेश बेडेकर पहिला
....................
कोल्हापूर, ता. २७ ः प्रसिध्द आर्किटेक्ट स्वर्गीय आर. एस. बेरी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय शॉर्टफिल्म स्पर्धेत प्रथमेश बेडेकर यांनी पहिला क्रमांक पटकावला. या स्पर्धेत विक्रम रेपे व अरूंधती पाटील यांनी अनुक्रम दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. संस्कृती जाधव पूर्वा सप्रे यांना या स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.
कै. बेरी यांनी बांधलेल्या वास्तुवर आधारित चित्रफित या स्पर्धेचा विषय होता. बेरी यांच्या ताराबाई पार्कातील रविंद्र उबेरॉय यांच्या ‘गितांजली’ बगल्यावर आधारित शॉर्टफिल्मला दुसरा क्रमांक मिळाला. ही फिल्म तयार करणारे विक्रम रेपे, रविंद्र बागल, विनय कांदेकर यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व रोख २० हजार रूपये देऊन गौरवण्यात आले. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, इंग्लडचे प्रसिध्द आर्किटेक्ट क्रिस्तोफर बेनिंजर, प्रमोद बेरी, शिरीष बेरी यांच्या हस्ते हा कार्यक्रम शिवाजी विद्यापीठातील भाषा भवन येथे झाला.
शिवाजी विद्यापीठातील डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी, इंडियन इन्स्टीट्युट ऑफ आर्किटेक्ट असोशिएशन, असोशिएशन ऑफ आर्किटेक्ट अँड इंजिनियर्स, इन्स्टीट्युट ऑफ इंडियन इंटेरियर डिझायनर्स, डेक्कन इन्स्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थांच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90948 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..