गोकुळ दरवाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोकुळ दरवाढ
गोकुळ दरवाढ

गोकुळ दरवाढ

sakal_logo
By

‘गोकुळ’ची गाय दूध
खरेदी दरात १ रुपये वाढ
कोल्हापूर, ता. २७ ः कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) संघाशी संलग्न दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर १ रुपयांची वाढ केली. २५ ऑगस्टला झालेल्या संचालक मंडळाच्‍या बैठकीत निर्णय घेण्‍यात आला, अशी माहिती संघाचे अध्यक्ष विश्‍वास पाटील यांनी दिली.
२१ ऑगस्टपासून गाय दूध खरेदी दर ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ प्रतिचे दुधास प्रतिलिटर ३१ रुपये असा नवा दर राहील, अशी माहिती श्री. पाटील यांनी दिली. गाय दूध खरेदी दरातील ही चौथी दरवाढ असून त्यातून दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केल्याचे ते म्हणाले. तसेच सुधारित दरपत्रक संघामार्फत प्राथमिक दूध संस्थांना पाठवणेत येणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90965 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..