दोन लाखांच्या बनावट नोटा जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोन लाखांच्या 
बनावट नोटा जप्त
दोन लाखांच्या बनावट नोटा जप्त

दोन लाखांच्या बनावट नोटा जप्त

sakal_logo
By

46005
गडहिंग्लज : महागावमध्ये बनावट नोटा खपविण्यासाठी आलेल्या तिघांना शनिवारी पोलिसांनी पकडले. संशयितांसह कारवाई करणारे पोलिस पथक.

दोन लाखांच्या
बनावट नोटा जप्त
महागावच्या दोघांसह चिक्कोडीच्या एकाला अटक

सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २७ : बनावट चलनी नोटा खपविण्यासाठी आलेल्या तिघांना येथील पोलिसांनी आज सापळा रचून पकडले. या त्रिकुटाकडून पाचशे, दोनशे व शंभर रुपयांच्या एक लाख ८८ हजार ६०० रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या. महागाव (ता. गडहिंग्लज) येथे दुपारी एकच्या सुमारास कारवाई झाली. अब्दुलरजाक आब्बासाहेब मकानदार (वय २५, एकसंबा रोड, मेहबूबनगर, चिक्कोडी, जि. बेळगाव), अनिकेत शंकर हुले (२०, रा. महागाव), संजय आनंदा वडर (३५, सध्या रा. शिक्षक कॉलनी नेसरी, ता. गडहिंग्लज, मूळ गाव महागाव) अशी संशयितांची नावे आहेत.
याबाबतची पोलिसांनी दिलेली माहिती अशी : येथील पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांना महागावातील पाच रस्ता चौकात दोघे बनावट नोटा खपविण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. उपनिरीक्षक विक्रम वडणे यांच्या नेतृत्वाखाली सहा पोलिसांचे पथक कारवाईसाठी रवाना झाले. पथक दोन गटांत विभागून पाच रस्ता चौकात थांबले होते. दरम्यान, एक व्यक्ती मोटारसायकलवरून गडहिंग्लजकडून आली. चौकात थांबलेल्या दोघांजवळ तो गेला. संशयावरून पोलिस पथकाने त्यांना पकडले.
पथकाने त्यांची झडती घेतली असता, मकानदारकडे पाचशेच्या ६५ हजार ५०० रुपये किमतीच्या, अनिकेत हुलेकडे दोनशेच्या ६७ हजार रुपये किमतीच्या, तर संजय वडरकडे शंभरच्या ५६ हजार १०० रुपये किमतीच्या नोटा आढळून आल्या. त्यासोबत ४० हजार रुपये किमतीची मोटारसायकलही जप्त केली आहे. श्री. वडणे, हवालदार बाजीराव कांबळे, राजकुमार पाटील, पोलिस नाईक नामदेव कोळी, दादू खोत, कॉन्स्टेबल दीपक किल्लेदार, गणेश मोरे यांनी कारवाई केली.


चिक्कोडीत तयार केल्या नोटा...
पोलिसांनी मकानदारच्या चिक्कोडीतील घराची झडती घेतली. घरामध्ये बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरलेले प्रिंटर, शाई आढळून आली. जप्त करण्यात आलेल्या बनावट नोटा चिक्कोडीत तयार केल्याचे स्पष्ट होत आहे. कर्नाटकात नोटांची छपाई करून त्या महाराष्ट्रात खपविण्याचा संशयितांचा कट पोलिसांच्या कारवाईमुळे फसला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91010 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..