तिसऱ्या दिवशी उपांत्य सामन्याचा थरार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तिसऱ्या दिवशी उपांत्य सामन्याचा थरार
तिसऱ्या दिवशी उपांत्य सामन्याचा थरार

तिसऱ्या दिवशी उपांत्य सामन्याचा थरार

sakal_logo
By

46011

तिसऱ्या दिवशी उपांत्य सामन्याचा थरार 
बॅडमिंटन स्पर्धा; ३३ सामन्यांत पुढील फेरीसाठी चुरस

कोल्हापूर, ता. २७ :  कोल्हापूर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन आयोजित स्पर्धेच्या तिसऱ्या उपांत्यपूर्व सामने झाले. दिवसभरात झालेल्या ३३ सामन्यांत पुढील फेरी गाठण्यासाठी चुरस रंगली. स्पर्धेसाठी मेनन पिस्टन रिंग्ज प्रायोजक आहेत. 
१३ वर्षांखालील मुलांच्या स्पर्धेत झालेल्या चुरशीच्या लढतीत शिवम मोरेने श्रेयस घरसे याच्यावर १३-२१ पिछाडीवरून २१-१२, २१-१० या गेम ने विजय मिळवला. अन्य सामन्यात आयुष कदमने नील शिरोडकर वर २२-२०, २१-१६ असा विजय मिळवला.
मुलींच्या गटात अन्वी थोरातने प्रगतीवर २१-५, २१-७ अशी एकतर्फी मात केली. श्रेया सूर्यवंशीने अंकिता मांगलेचा २१-१५, २१-१७ अशा स्कोअरने पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.  १७ वर्षांखालील मुलांच्या गटात प्रांजल मानेने सिद्धार्थ खवटवर २१-१६, २२-२५, २१-८ या गेम ने विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. या गटातील अन्य लढतीत रुद्रा उमराणीया, अपूर्व दवदाते आणि चिन्मय ढवळशंख यांनी प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली.
मुलींत श्रीनिका हांजी आणि आसावरी चव्हाण ही लढत चुरशीची झाली. या लढतीत श्रीनिका हांजीने १३-२१, २१-१५, २१-१६ या स्कोअरने विजय मिळवून उपांत्यफेरीत प्रवेश केला. याच गटात विभा पाटील, गार्गी आंबेकर आणि राधिका काणे यांनीही उपांत्यफेरी गाठली.
११ वर्षाखालील मुलांच्या गटात पुष्कर खोत, अर्णव दंबाळ, सुजन कुलकर्णी, शौर्य कदम यांनी तर 
१५ मुलांच्या गटात रणवीर चव्हाण,चैतन्य तारे, शिवम मोरे आणि आयुष पाटील यांनी दमदार खेळ करत उपांत्यफेरीत प्रवेश केला.
मुलींच्या स्पर्धेत हार्दीका शिंदे, रुतीका कांबळे यांनीही उपांत्यफेरीत प्रवेश केला.
१९ वर्षांखालील मुलांच्या दुहेरी मध्ये उपांत्य फेरीत चिन्मय ढवळशंख व हर्षवर्धन या जोडीने भूषण पाटील आणि दिलीप निकम यांचा २१-१०, २१-१० असा पराभव करून स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. तसेच याच गटातील रितेश सांडूगडे आणि रुद्र साळोखे या जोडीने सुजल सोलापूरे आणि विराज थोरात या जोडीचा पराभव करून अंतिम फेरी गाठली.
१३ वर्षांखालील मुलांच्या उपांत्य फेरीत चैतन्य तारेने आयुष कदमवर २१-७, २१-६ असा विजय मिळवून अंतिम फेरी गाठली.आयुष पाटीलने शिवराम मोरेचा पराभव करत स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91021 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..