दौलत नगरमध्ये विद्युत खांब धोकादायक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दौलत नगरमध्ये  विद्युत खांब धोकादायक
दौलत नगरमध्ये विद्युत खांब धोकादायक

दौलत नगरमध्ये विद्युत खांब धोकादायक

sakal_logo
By

46019

दौलत नगरमध्ये वीज खांब धोकादायक
कोल्हापूर, ता. २९ ः दौलत नगरमध्ये तीन बत्ती चौकात एक वीज खांब आहे. हा खांब खालच्या बाजूला पूर्ण गंजला असून, कधीही पडेल अशा स्थितीत आहे. या खांबाची दुरुस्ती न केल्यास एखादी मोठी दुर्घटना घडण्याचा संभव आहे. त्यामुळे खांब तत्काळ दुरुस्त करावा किंवा बदलावा, अशी मागणी परिसरातील विशाल कला, क्रीडा व सांस्कृतिक तरुण मंडळाने केली असून, त्याबाबतचे निवेदनही महापालिका विद्युत विभागाला दिले आहे; मात्र अद्याप याची दखलही प्रशासनाने घेतलेली नाही.
निवेदनातील माहितीनुसार, तीन बत्ती चौकातील हा वीज खांब सुमारे ४० वर्षे जुना आहे. हा खांब गंजला असून, खालून तो काही ठिकाणी तुटला आहे. जोराचा वारा किंवा पाऊस आल्यास हा खांब कोसळू शकतो. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याचा धोका आहे. याबाबत महापालिका विद्युत विभागाकडे वारंवार तक्रार केली आहे; मात्र त्याची दखल प्रशासनाने घेतलेली नाही. याचा पाठपुरावा केला की, माणसे पाठवतो असे सांगितले जाते; पण प्रत्यक्षात कोणी येत नाही. महापालिकेने तत्काळ याची दखल घ्यावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91036 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..