गोकुळ खुलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोकुळ खुलासा
गोकुळ खुलासा

गोकुळ खुलासा

sakal_logo
By

दूध खरेदी दरात वाढ हीच कामाची पावती
अध्यक्ष विश्‍वास पाटील; उत्पादकांना दिलासा देण्याचे काम ‘गोकुळ’ने केले
कोल्हापूर, ता. २७ ः वर्षभरात गाय खरेदी दरात तीनवेळा केलेली वाढ हीच कामाची पोहच पावती असल्याचा खुलासा गोकुळचे अध्यक्ष विश्‍वास पाटील यांनी पत्रकाद्वारे केला आहे. पशुखाद्यासाठी लागणाऱ्या कच्‍च्‍या मालाचे दर १८ ते ४० टक्क्यांने वाढले; मात्र दूध उत्पादकांना वाजवी दरामध्ये पशुखाद्य देणे हे धोरण आहे. परिणामी दूध उत्पादनात वाढ झाली आहे. पशुखाद्य विक्रीत १४.७२ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे गेल्यावर्षी दूध संकलनामध्ये ११.९४ टक्के वाढ झाली. यापूर्वी ही आर्थिक वर्ष २०१२-१३ मध्ये रुपये ७ कोटी ९७ लाख इतके अनुदान पशुखाद्य विभागास दिल्याचे पत्रकात म्हटले आहे.
पशुखाद्य विक्रीतील १५ टक्के वाढ, याही वर्षी सातत्याने पशुखाद्य मागणीत होणारी वाढ, भविष्यात संघाने करावयाचे २० लाख संकलनाचे उद्दिष्ट, गडमुडशिंगीचा ४० वर्षांपूर्वी कार्यान्वित केलेला पशुखाद्य कारखाना, वारंवार येणारे ब्रेकडाउन व त्यामुळे कमी झालेली उत्पादनातील कार्यक्षमता याचा विचार करता पशुखाद्य कारखान्याचे विस्तारीकरण गरजेचे आहे. संघाने ग्राहक दरवाढ स्वतः केलेली नाही बाजारामध्ये स्पर्धकांनी दुधाचे खरेदी व विक्री वाढ केली होती. स्वतःचे संकलन टिकवून ठेवण्याकरिता जास्त दर देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
गेल्यावर्षी देशपातळीवरही दूध उत्पादनात घट झाली आहे. दूध संस्था रजिस्टर करणे संघाचे काम नाही, ते शासनामार्फत होते. नोंदणी झालेल्या संस्था संघामार्फत पोटनियमातील तरतुदीनुसार दुधाचा पुरवठा केल्यानंतर सभासदत्त्व दिले जाते. गेल्यावर्षी दूध संकलन ५ कोटी ३३ लाखांने वाढल्याने तात्पुरत्या स्वरुपात संघाच्या मुदत बंद ठेवी दूध बिल आदा करते वेळी वापरल्या जातात. पावडर व लोणी यांचा स्टॉक वाढल्याने संघाच्या अखेर शिल्लक मालाची रक्कम वाढलेली दिसते व मुदत बंद ठेवीच्या रकमेमध्ये घट दिसते. वाशी शाखा येथे जागा खरेदी केली आहे. त्यामुळे मुदत बंद ठेवी कमी दिसत आहेत.
रिझर्व्ह बँकेने बँकांचे ऑडिट करून बचत खात्यावर व्याज देण्यास बँकांना निर्बंध आणल्याने व्याज दरात तूट दिसते. मुंबई येथे इग्लु पॅकिंग कंपनीचा दर रुपये १.७४ प्रतिलिटर तर महानंद पॅकिंग दर रुपये १.५५ प्रतिलिटर आहे. या व्यवहारात ०.१९ पैसे संघाचा फायदा झाला. ईग्लूने पॅकिंग सुविधा बंद करीत असल्याचे पत्र दिले होते. त्‍यामुळे महानंद येथे पॅकिंग सुरू केले. राज्यातील खासगी दूध संघांकडून खरेदी केलेले दूध व त्याची गुणवत्ता योग्य आहे का, राज्याबाहेरील म्हैस दूध खरेदी अनेक वर्षापासून केली जाते. या दूधावर प्रतिलिटर २ रुपयायांप्रमाणे दरफरक द्यावा लागत नाही. ताजे दूध घेऊन पुरवठा सुरळीत ठेवणे व विक्री वाढवणे हे दोन्ही हेतू साध्य होत आहेत.

सर्व प्रश्‍नांची उत्तरे देऊ
संघाची सर्वसाधारण सभा सोमवारी (ता. २९) होत आहे. सभा खेळीमेळीच्या वातावरणात संघाचे सभासद पार पाडतील. ‘गोकुळ’ च्या सभेस विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे समाधानकारक व समर्पक उत्तरे सभेत दिली जातील, असे आश्‍वासन श्री. पाटील यांनी दिले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91070 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..