ब्रॅंड ऑफ कोल्हापूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ब्रॅंड ऑफ कोल्हापूर
ब्रॅंड ऑफ कोल्हापूर

ब्रॅंड ऑफ कोल्हापूर

sakal_logo
By

लोगो शनिवारच्या (ता.२७) टुडे १ वरून घेणे
-
४६०४५ ( फोटो ६ कॉलम वापरणे)

कोल्हापूर : ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे हॉटेल सयाजीमध्ये ‘ब्रॅंडस ऑफ कोल्हापूर'' ॲवॉर्ड वितरणाचा दिमाखदार सोहळा झाला. या वेळी कणेरी मठाचे मठाधिपती अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी, ‘सकाळ माध्यम समूहा’चे संपादक संचालक श्रीराम पवार, कार्यकारी संपादक निखिल पंडितराव, उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर यांच्यासह पुरस्कारप्राप्त व्यक्ती व संस्थांचे प्रतिनिधी. (बी. डी. चेचर ः सकाळ छायाचित्रसेवा)
-
उद्योजक, व्यावसायिकांचे
राष्ट्रउभारणीत मोठे योगदान

काडसिद्धेश्वर स्वामी ः ‘ब्रॅंडस ऑफ कोल्हापूर’ ॲवॉर्डचे दिमाखदार सोहळ्यात वितरण

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २८ ः ‘‘राष्ट्रउभारणीत उद्योजक, व्यावसायिकांचे योगदान मोलाचे आहे. त्यामुळे नव्या पिढीवर शालेय वयापासूनच पालकांनी उद्योजकतेचे संस्कार रुजवले पाहिजेत,’’ असे स्पष्ट मत कणेरी मठाचे मठाधिपती अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांनी व्यक्त केले. विविध अडचणींवर मात करत संघर्षातूनच कोणताही उद्योजक किंवा व्यावसायिक घडत असतो आणि तो अनेकांना रोजगार मिळवून देत असतो. देशातील संपत्तीच्या विकेंद्रीकरणासाठी अशा उद्योजकांची संख्या आणखी वाढायला हवी, अशी अपेक्षाही त्यांनी या वेळी व्यक्त केली. ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे शनिवारी (ता. २७) झालेल्या ‘ब्रॅंडस ऑफ कोल्हापूर’ ॲवॉर्डचे वितरण सोहळ्यात ते बोलत होते. हॉटेल सयाजीच्या मेघमल्हार हॉलमध्ये हा दिमाखदार सोहळा सजला.
अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी म्हणाले, ‘‘गावं बकाल होता कामा नयेत आणि शहराला सूज येता कामा नये, यासाठी येत्या काळात प्रयत्न करावे लागणार आहेत. कारण हा समतोल बिघडला तर अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे गावागावांत विविध उद्योग व व्यवसायांना चालना देणे आवश्यक आहे. विविध क्षेत्रात असेच वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा ‘सकाळ’च्या माध्यमातून होत असलेला गौरव त्यासाठीच अतिशय महत्त्‍वाचा आहे.’’
‘सकाळ माध्यम समूहा’चे संपादक संचालक श्रीराम पवार म्हणाले, ‘‘राष्ट्राच्या उभारणीत संपत्ती निर्मिती ही महत्त्‍वाची असली तरी भौतिक आणि आध्यात्मिक अशी सांगड येत्या काळात महत्त्‍वाची ठरणार आहे. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या कार्यातूनही ते अधिक ठळकपणे जाणवते आणि म्हणूनच त्यांच्या हस्ते उद्योजकांचा गौरव होत असताना संतुलित जीवनाचा विचार अधिक घट्ट होणार आहे.’’
कार्यकारी संपादक निखिल पंडितराव यांनी आभार मानले. समाजाच्या भल्यासाठी ‘सकाळ’ नेहमीच अग्रेसर असून, पुरस्कार वितरणाचा सोहळा त्याचाच एक भाग असल्याचे त्यांनी सांगितले. उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर व्यासपीठावर उपस्थित होते. भूषण करंदीकर यांनी सूत्रसंचालन केले.

ठळक चौकट
यांचा झाला गौरव...
श्री अन्नपूर्णा शुगर व जागरी वर्क्स लिमिटेड (केनवडे), श्रद्धा इन्स्टिट्यूट (इचलकरंजी), डीकेटीई टेक्सटाईल ॲण्ड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट (इचलकरंजी), नितीन धूत (इचलकरंजी), चौगुले स्वीट मार्ट ॲण्ड डेअरी (इचलकरंजी), सुपर अभिनव सायन्स ॲकॅडमी (गडहिंग्लज), बालाजी कलेक्शन (कोल्हापूर), एस. एम. ट्रॅक्टर स्पेअर्स (शिरोली पुलाची, कोल्हापूर), एचपी हॉटेल्स (कोल्हापूर), सलगर अमृततुल्य चहा (कोल्हापूर), करवीर क्रिएशन (कोल्हापूर), मेसर्स गोपीनाथ अनंत चिपडे सराफ (कोल्हापूर), सावंत कोचिंग क्लासेस ॲण्ड सावंत ॲकॅडमी (कोल्हापूर), वॉलस्टार टेक्नॉलॉजीज प्रा. लि. (कोल्हापूर), दि कागल एज्युकेशन सोसायटी (कागल), श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था लि. (मुरगूड), राजे विक्रमसिंह घाटगे को-ऑपरेटिव्ह बँक लि. (कागल), हुतात्मा स्वामी वारके सहकारी सूतगिरणी लि. (मुदाळ), वर्ल्ड वंडर्स टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स (कोल्हापूर), कॉनसॉफ्ट (कोल्हापूर), सेफसिल मशिन्स प्रा. लि. (कोल्हापूर).

चौकट
सुखी कुटुंबं पाहून समाधान...
अनेक अडचणींवर मात करीत कागल तालुक्यातील विविध गावांत हरितक्रांती आली आणि त्यामुळेच गावांचा विकास झाला. गावागावांतील अशी सुखी कुटुंबं पाहून समाधान वाटते, असे माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी या वेळी सांगितले. पुरस्कारप्राप्त व्यक्ती व संस्थांच्या वतीने त्यांनी कार्यक्रमात मनोगत व्यक्त केले. ‘सकाळ माध्यम समूहा’चेही त्यांनी या वेळी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91073 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..