शेती पेरणी विना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेती पेरणी विना
शेती पेरणी विना

शेती पेरणी विना

sakal_logo
By

१२५ हेक्टर पेरणी ठप्प
ऊखळूसह सात गावांना भूस्खलनाचा फटका; रोजगारासाठी मुंबईचा आधार

कोल्हापूर , ता. ३१ ः सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचं जंगल, डोंगर उतारावरील शेतीत भात, फळभाजीच्या पिकांवर ऊखळू (ता.शाहूवाडी) सह सात वाडीतील अडीचेहून अधिक शेतकरी शेतमजूरांचा उदर्निवाह चालत होता. गेल्या वर्षीच्या धो पावसाचे पाणी डोंगरात मुरले. डोंगराच्या एकेक कडा कोसळल्या. या भूसख्खलनाने शेकडो हेक्टर शेतीचा घास गिळला. त्याला वर्ष उलटले. आजही त्या शेतात दगड, गोठे, मातीचा भराव तसाच आहे. त्यामुळे यंदा जवळपास अंदाजे १२५ हेक्टर जमीनीत पेरणीच झाली नाही. पीक नाही म्हणून शेतीचा रोजगार नाही. खायचे काय म्हणून अनेकजन मुंबईला रोजगाराला जाताहेत. शेती भविष्यात पिकेल की नाही याची चिंता घराघरात आहे.
ऊखळू गावाचे प्रकाश जाधव यांची तीन एकर जमीनीची अशी दशा झाली. त्यांच्या सोबत शित्तुर वारूण, कांडवण, वीरले, उदगीर, आमजाईवाडी गावातील अनेकांच्या जमीनीत भूस्खलन झाले.
दोन वर्षापूर्वीपर्यंत येथील डोंगरी जमीनीत भात, नाचणी, फळभाजा पिकवल्या जात होत्या. त्याच भागात गतवर्षी भूसख्लन झाले. ज्या जमीनीत एकरी २५ ते ३० हजार रूपये खर्चून भात लावणी केली होती. तेच शेती पिक गाढले गेले. शासकीय यंत्रणा आल्या. त्यांनी पंचनामे केले. १४ हजार रूपये भरपाई शासनाने दिली. त्यानंतर शासकीय यंत्रणा येथे फिरकली नाही.
आता आहे ही शेती पून्हा दुरूस्त करायला, वाहून आलेले दगड गोठे काढायला जेसीबी लावावा लागेल. त्याचे भाडे भरण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. जेसीबी लावल्याशिवाय शेती सपाट होणार नाही. दगड गोठे बाजूला होणार नाहीत. असे एक नव्हे दोन नव्हे तर १२५ हेक्टर हून अधिक शेती यंदा लागवडीविना ठेवावी लागली.
पर्याय नाही म्हणून घराघरातील एखादी व्यक्ती मुंबईत रोजगार करते. त्यांच्या जोडीला रोजगारासाठी याच गावातील अन्य लोक आता जात आहेत. तेथे पैसा साठला तरच जेसीबी लावून गावची शेती जमीन पून्हा सस्थितीत करण्याचा मनोदय काहींचा आहे. तर काहीजन अद्याप येथे किरकोळ कामाच्या शोधात आहेत.

कोट
गतवर्षी पंचनामे झाले, भरपाई मिळाली. पण, शेतीचा प्रश्न संपलेला नाही. जमीन सरळ करून घेण्यासाठी जेसीबी सवलतीच्या भाड्यात जेसीबी मिळवावा लागेल. शेती दुरस्तीसाठी कर्ज मिळणे पुढील काळात पुन्हा भूस्खलन झाल्यास विमा संरक्षण मिळणे यासाठी शासकीय यंत्रणाची मदत घ्यावी लागेल. त्यासाठी विचारविनिमय सुरू आहे. संघटीत बळावर पाठपुरावाही करणार आहोत.
-हरीष कांबळे, ग्रामस्थ, ऊखळू

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91087 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..