प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प

sakal_logo
By

फोटो-SGI22B26147
सांगली ः संग्राम हजारे यांच्या ‘रिकामटेकड्यांचे आत्मवृत्त’ कवितासंग्रहाचे प्रकाशन शनिवारी झाले. यावेळी डावीकडून संजय साठे, उमेश कुलकर्णी, प्रा.अविनाश सप्रे, कवी हजारे, रामदास फुटाणे, सौमित्र, संजय चौधरी, नागराज मंजुळे.

कवितेत रमलेला मायेचा गोतावळा
‘रिकामटेकड्याचे आत्मवृत्त’ चे गर्दीत प्रकाशन
सकाळ वृत्तसेवा
सांगली,ता.२७ ः फॅन्ड्री, सैराटचा नागराज मंजुळे, ‘देऊळ’वाला उमेश कुलकर्णी, वात्रटिकाकार रामदास फुटाणे, सौमित्र तथा किशोर कदम अशा मराठी चित्रपट-साहित्यविश्‍वातील दिग्गजांची उपस्थिती एका कवितासंग्रहाच्या प्रकाशनासाठी आज सांगलीत उपस्थित होती. पुस्तक प्रकाशानसाठी कधी नव्हे ते आज भावे नाट्यगृह भरले. जयसिंगपूरचे रहिवासी आणि सांगलीच्या कलाविश्‍व महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी संग्राम हजारे यांचा हा सारा गोतावळा मायेने ओथंबलेल्या भावनेने एकत्र आला.
दुर्लक्षित- वंचितांना चित्रपटांचे विषय करणाऱ्या नागराज यांच्या ‘आटपाट’ प्रकाशन संस्थेचेही तेच ब्रीद आहे. अनेक प्रचलित प्रथा परंपरांना फाटा देत हा कार्यक्रम रंगला. कवी हजारे यांनी आपला काव्यप्रवास त्रोटक शब्दातच सांगितला. मात्र हा कवि कोण याचं सभागृहाला मोठं कुतूहल होतं. ते म्हणाले, ‘‘चौथीपासून न कळत्या वयात मला लिहण्याची प्रेरणा मिळाली. मी पाहिलेल्या माझ्या मामांच्या आठवणींनी मी पुस्तकांकडे ओढलो गेलो. हा प्रवास पुढे ग्रेस..आरतीप्रभू अरुण कोल्हटकर अशा माझ्या आवडीच्या कवितांनी अधिक समृध्द केला. माझं लेखन मनाच्या पोकळीचा शोध घेणारं आहे. ते येतं कसं, हे मला सांगता यायचं नाही. ते प्रसिध्द व्हावं, यासाठी लिहलं नाही. मात्र नागराज आणि माझ्या या सर्व घरच्यांनी मायेने घडवून आणलेल्या या समारंभात मला बोलायला शब्द सूचत नाहीत.’’
मंजुळे यांनी आज सूत्रसंचालकाची भूमिका बजावली. याआधी कोठेही प्रसिध्द न झालेल्या या नितळ पारदर्शक कविता लोकांपुढे याव्यात या हेतूने काव्यसंग्रह प्रकाशित करीत असल्याचे त्यांनी प्रारंभीच सांगितले. समीक्षक अविनाश सप्रे म्हणाले, ‘‘अशी निर्भेळ कविता पुस्तकरुपाने येत आहे. हा पहिला कवितासंग्रह असला तरी त्यात पहिलेपणाच्या खुणा नाहीत.’’ दिग्ददर्शक उमेश कुलकर्णी म्हणाले, ‘‘कला क्षेत्रात कप्पे करण्याचा हा काळ आहे. अशा काळात सर्व विविध कलाक्षेत्रातील लोक एकत्रित विचार करीत हा कवितासंग्रह प्रकाशित करीत आहेत.’’ रामदास फुटाणे म्हणाले, ‘‘मी भाष्य, कविता करतो. राजकारणाच्या पलिकडेही जाऊन निखळ आनंदाची अनेक क्षेत्रे आहेत, त्यात रमले पाहिजे. आजचा समारंभ त्यातला आहे.’’ कवी सौमित्र यांनी संग्रहातील निवडक कवितांचे वाचन केले. यावेळी संजय साठे, संजय चौधरी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91090 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..