अमेरिका-महाराष्ट्र करार -ललीत गांधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अमेरिका-महाराष्ट्र करार -ललीत गांधी
अमेरिका-महाराष्ट्र करार -ललीत गांधी

अमेरिका-महाराष्ट्र करार -ललीत गांधी

sakal_logo
By

४६०५४

अमेरिकेशी व्यापाराच्या संधी खुल्या होतील
---
रणधीर जायस्वाल; महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे अमेरिकेत व्यापार परिषद
कोल्हापूर, ता. २७ ः महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने अमेरिकेत व्यापार परिषदेचे आयोजन केले. तेथे महाराष्ट्राला ज्या पद्धतीने सादर केले, त्यावरून महाराष्ट्र व अमेरिकेदरम्यान गुंतवणुकीच्या नवीन संधी खुल्या होतील, असा विश्‍वास भारताचे न्यू यॉर्कमधील कॉन्सुलेट जनरल रणधीर जायस्वाल यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर’ व बृहन्महाराष्ट्र मंडळ अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने अमेरिकेतील अटलांटीक सिटी (न्यू जर्सी) येथे ‘व्यवसाय परिषदे’च्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते.
महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी परिषदेच्या अध्यक्षस्थानी होते. परिषदेच्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्षा विद्या जोशी, व्यवसाय परिषदेचे निमंत्रक आनंद चौथाई, नारीशक्ती पुरस्कार विजेत्या श्रीमती रूमादेवी, पर्सिस्टंट कंपनीचे प्रमुख आनंद देशपांडे, विकास बावधनकर, नरेन गोडसे, नवीन पाठक, चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी व्यासपीठावर उपस्थित होते.
श्री. गांधी यांनी महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासातील महाराष्ट्र चेंबरच्या योगदानाची माहिती देऊन महाराष्ट्र हे भारतातील आघाडीचे औद्योगिक राज्य असून, गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण असल्याचे सांगितले. उत्तम बाजारपेठ, कुशल मनुष्यबळ उपलब्ध असणारे राज्य असून, व्यापारात संयुक्त उपक्रमांसाठी व नवीन गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र सर्वांत उत्तम पर्याय असल्याचे त्यांनी आग्रहपूर्वक नमूद केले. श्री. दाशरथी यांनी महाराष्ट्राच्या विभागवार वैशिष्ट्यासह प्रभावी सादरीकरण केले.
बृहन्महाराष्ट्र मंडळातर्फे आयोजित विविध उपक्र‘मांना अमेरिकेतील विविध प्रांतातून आलेल्या पाच हजारांवर मान्यवरांनी सहभाग घेतला. महाराष्ट्रात गुंतवणुकीच्या विविध प्रस्तावांवर चर्चा झाली. या वेळी दीपक शिकापूर, प्रवीण पाटील, शेखर चिटणीस, विनीत पोळ, नितीन इंगळे, श्‍वेता इनामदार, प्रज्ञा पोंक्षे, भाऊसाहेब कालवाघे, रविराज अहिरराव, संजीव तांभोरकर यांनी बैठकांमध्ये सहभाग घेतला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91094 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..