सीपीआर यशस्वी शस्त्रक्रीया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सीपीआर यशस्वी शस्त्रक्रीया
सीपीआर यशस्वी शस्त्रक्रीया

सीपीआर यशस्वी शस्त्रक्रीया

sakal_logo
By

‘सीपीआर’मध्ये अवघड
हृदय शस्त्रक्रिया यशस्वी
कोल्हापूर, ता. २८ ः सीपीआर हृदय शस्त्रक्रिया विभागात उपचारांसाठी आलेल्या ५३ वर्षीय महिलेला उजवीकडे हृदय असल्याचे तपासणीअंती पुढे आले. यातच तिला ब्लॉकेजेस् होते. तिच्यावर विनाछेद अवघड हृदय शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात वैद्यकीय पथकाला यश आले, अशी माहिती हृदयविकार तज्ज्ञ डॉ. विदुर कर्णिक यांनी दिली. गारगोटी येथील महिलेला हृदयविकाराचा धक्का बसल्याने खासगी रुग्णालयात दाखविले होते. मात्र, चाचण्या करताच त्यात गुंतागुंत आढळली. त्यानंतर संबंधित महिलेला ‘सीपीआर’च्या हृदय शस्त्रक्रिया विभागात दाखल करण्यात आले. डॉ. कर्णिक यांनी तिची तपासणी केली. त्यांना या महिलेचे हृदय उजवीकडे असल्याचे लक्षात आले. याशिवाय, हृदयाकडून जाणाऱ्या नसांत तीन ठिकाणी ब्लॉकेजेस आढळले. या महिलेची प्रकृती गंभीर बनल्याने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार डॉक्टरांनी वैद्यकीय शिक्षण, अनुभव, वैद्यकीय तंत्रज्ञान आणि उपचारांबाबत घेऊन एनजीओप्लास्टी यशस्वी केली. विनाछेद शस्त्रक्रियेनंतर या महिलेच्या जीवाचा धोका टळण्यास मदत झाली आहे. प्रकृतीत सुधारणा झाल्याने या महिलेला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. शस्त्रक्रियेसाठी डॉ. अक्षय बाफना, डॉ. सचिन निकम, डॉ. भूपेंद्र पाटील, तंत्रज्ञ देवेंद्र शिंदे, तंत्रज्ञ बिरांजे यांचे सहकार्य मिळाले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91126 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..