‘साधना’मध्ये ७ सप्टेंबरला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘साधना’मध्ये ७ सप्टेंबरला
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन
‘साधना’मध्ये ७ सप्टेंबरला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन

‘साधना’मध्ये ७ सप्टेंबरला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन

sakal_logo
By

‘साधना’मध्ये ७ सप्टेंबरला
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २८ : येथील पंचायत समिती व साधना हायस्कूलतर्फे यंदाचे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन होणार आहे. साधना हायस्कूलमध्ये ७ सप्टेंबरला सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या कालावधीत हे प्रदर्शन होईल. प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची सहविचार सभा झाली. या सभेत निर्णय घेण्यात आला.
यंदाच्या विज्ञान प्रदर्शनाचा तंत्रज्ञान आणि खेळणी हा मुख्य विषय आहे. पर्यावरणास अनुकूल सामग्री, आरोग्य आणि स्वच्छता, सॉफ्टवेअर आणि अॅप्स, वाहतूक-परिवहन, पर्यावरण आणि हवामान बदल, गणितीय मॉडेलिंग हे उपविषय आहेत. सर्व शाळांनी नोंदणी करून उपकरणांची मांडणी करावी, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हालबागोळ यांनी केले. विज्ञान प्रदर्शनाबाबत बाळासाहेब मुल्ला यांनी मार्गदर्शन केले. राजेंद्र चौगुले यांनी पोषण आहार, तर खरात यांनी ‘शाळासिद्धी’बाबत मार्गदर्शन केले. विस्तार अधिकारी आर. आर. कोरवी, चंद्रकांत जोशी यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91156 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..