"मेघोली'' धरण बांधकामाची प्रशाकीय मान्यता आठवड्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

"मेघोली'' धरण बांधकामाची प्रशाकीय मान्यता आठवड्यात
"मेघोली'' धरण बांधकामाची प्रशाकीय मान्यता आठवड्यात

"मेघोली'' धरण बांधकामाची प्रशाकीय मान्यता आठवड्यात

sakal_logo
By

46215

मेघोली बांधकामाची आठवड्यात मान्यता
---
धरण फुटीच्या घटनेची वर्षपूर्ती ; पाण्याविना शिवार अद्यापही भकास
सुनील पाटील : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २८ : गेल्या वर्षी १ सप्टेंबर २०२१ ला फुटलेल्या मेघोली धरण बांधकामाला प्रशासकीय मंजुरी घेण्याचे काम सुरू आहे. शिंदे-फडणवीस सरकारकडून या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यावर सुमारे ३५ ते ४० कोटी खर्च करून पुन्हा नव्याने मातीचे धरण बांधले जाईल.
आठवड्यात धरण बांधण्यासाठी प्रशासकीय मान्यता घेतली जाणार आहे.
भुदरगड तालुक्‍यातील मेघोली धरण फुटल्याने मोठे नुकसान झाले. यंदा हा प्रकल्प नव्याने भरला जाईल. याचे बांधकाम तत्काळ होईल, यासाठी प्रयत्न झाले. अखेर अनेक टप्पे खात हा प्रकल्प जलसंधारण विभागाकडे सुपूर्द केला आहे. दरम्यान, हा प्रकल्प वेळेत किंवा यावर्षीच पूर्ण झाला असता तर शेतीला पाणी मिळाले असते. धरण फुटल्याने यंदाचे पीक वाया गेले आहे; तर नवीन पिकासाठी २०२३ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
जलसंधारण विभागाकडून हे मातीचे धरण बांधण्यासाठी ३५ ते ४० कोटींचे नियोजन केले आहे. यासाठी शिंदे-फडणवीस सरकारकडून प्रशासकीय मान्यता घेतली जाईल. आठवडाभरात हे काम पूर्ण होणार असून, पुढील पावसाळ्यात हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरेल, असे नियोजन केले आहे.
वर्ष पूर्ण झाले; पण अजूनही हा प्रकल्प उभारणीसाठी प्रशासकीय मान्यतेपासूनच सुरुवात करावी लागत आहे. मेघोली परिसरातील सर्व शेतजमीन ही कोरडवाहू आहे. १९९५-९६ मध्ये हा प्रकल्प बांधण्यास प्रशासकीय मंजुरी मिळाली होती. त्या वेळी सुमारे आठ कोटी ४७ लाख रुपये खर्च झाला होता. धरण झाले आणि धरणामुळे कोरडवाहू असणारी जमीन सुपीक झाली. पण, धरणच फुटल्याने पाण्याअभावी नवले, ममदापूर, वेंगरूळ, सोनुर्ली व तळकरवाडीतील जमीन वाहून गेलेले शिवार अजूनही भकास आहे.

* मेघोली प्रकल्पाचे नियोजन :
* धरण बुडीत क्षेत्र- ३३.७४ हेक्‍टर
* धरण भिंतीची माथ्याची रुंदी- ९ मीटर
* धरणाची लांबी- ४९५ मीटर
* उंची- ३२.३० मीटर
* साठवण क्षमता- २.५४ दशलक्ष घनमीटर
...
मेघोलीचे धरण बांधकामासाठी जलसंधारण विभागाकडून सर्व प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. धरण नव्याने बांधण्यासाठी शासनाकडून प्रशासकीय मंजुरी घेतली जाईल. हा प्रस्ताव आठवडाभरात पाठवला जाईल. त्यानंतर पुढील पावसाळ्यात पाणीसाठ्याचे नियोजन आहे.
- बाळासाहेब आजगेकर, कार्यकारी अभियंता, जलसंधारण विभाग
...

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91166 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..