येई गणेशा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

येई गणेशा
येई गणेशा

येई गणेशा

sakal_logo
By

लोगो - येई गणेशा

46140

निसर्गमित्र संस्थेचा ‘माझा
गणपती, माझा रंग’ उपक्रम

कोल्हापूर, ता. २८ ः येथील निसर्गमित्र संस्थेने ‘माझा गणपती, माझा रंग’ हा उपक्रम राबविला. झेंडू, गोकर्ण, शेंदरी, पळस, शेवगा, कडुलिंब या वनस्पतींच्या पाना, फुलांचा वापर करून प्रायोगिकरित्या नैसर्गिक रंग तयार केले. आणि याच रंगाची शाडूची गणेशमूर्ती रंगविली. पन्नास भक्तांनी त्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला आहे.
निसर्ग मित्र संस्थेने गेली बावीस वर्षे शाडूच्या अडीच हजार गणेशमूर्ती तयार करण्यासाठी कमलाकर व प्रकाश आरेकर या कुंभार बंधूंची मदत घेतली. त्यास नियमित प्रतिसाद मिळाल्यानंतर त्या मूर्ती घरातच विसर्जन करून ती माती परत याच कुंभारांकडे परत करण्याची जबाबदारी नागरिकांनी स्वीकारलेली आहे. यामुळे नदी किंवा जलस्त्रोतांचे प्रदूषण नियंत्रण करण्यास मदत झाली. याच नागरिकांकडून मागणी झाल्याने या मूर्ती सोनेरी रंगाशिवाय मातीच्या पाण्यात विरघळणाऱ्या रंगात रंगवल्या. अशा मूर्ती घराच्या अंगणातच विसर्जन करण्यास सुरुवात झाली. जलस्त्रोतांचे प्रदुषण टाळणे , गर्दी टाळणे यासाठी घरातच विसर्जन करण्यास सुलभ ठरेल अशा मूर्तींची नागरिकांकडून मागणी होत आहे.
घरातील निर्माल्य व पाने, फुलांपासून आपणच रंगांची निर्मिती करावी आणि तेच रंग गणेशमूर्तीला द्यावेत अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली. त्यानुसार पुढच्या वर्षीच्या गणेशोत्सवात ही संकल्पना साकारण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांना विशेष प्रशिक्षण, शिबिराद्वारा माहिती दिली जाईल. यामध्ये सहभागी होऊन स्वतः तयार केलेल्या वनस्पतीजन्य रंगात आपली गणेशमूर्ती रंगवून तिची प्रतिष्ठापना करता येणार आहे.

कोट
‘माझा गणपती, माझा रंग’ या उपक्रमातून पर्यावरण रक्षणासोबतच एक शाश्वत असा पर्याय स्वीकारता येणार आहे. यासाठी निसर्गमित्र संस्थेशी संपर्क साधावा.
- अनिल चौगुले

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91212 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..