मलतवाडी ग्रामस्थांचा ग्रा.पं. वर मोर्चाचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मलतवाडी ग्रामस्थांचा ग्रा.पं. वर मोर्चाचा इशारा
मलतवाडी ग्रामस्थांचा ग्रा.पं. वर मोर्चाचा इशारा

मलतवाडी ग्रामस्थांचा ग्रा.पं. वर मोर्चाचा इशारा

sakal_logo
By

मलतवाडी ग्रामस्थांचा
ग्रामपंचायतीवर मोर्चाचा इशारा
कोवाड, ता. २८ : मलतवाडी (ता. चंदगड) येथील ग्रामपंचायतीने गावाशेजारी असलेला डांबर मिक्स प्लांट व खडी मशिन प्रकल्पाला दिलेला नाहरकत दाखला रद्द करावा व या प्रकल्पाचा धोका असल्याने तो बंद व्हावा, या मागणीसाठी ग्रामस्थांनी सोमवारी (ता. २९) सकाळी ११ वाजता ग्रामपंचायतीवर निषेध मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. त्यादृष्टीने शासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन ग्रामस्थांनी मोर्चाची तयारी केली आहे.
याबाबत मलतवाडीचे उपसरपंच जयवंत पाटील म्हणाले, डांबर मिक्स प्लांट व खडी मशिन प्रकल्पाला दिलेला नाहरकत दाखला ग्रामस्थांना विश्‍वासात घेऊन दिला होता. कोरोना काळात ग्रामसभा घेता येत नव्हती. त्यामुळे काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत यावर चर्चा करून १० ऑगस्ट २०२१ रोजी दाखला दिला होता. गावासाठी जलजीवन योजनेंतर्गत पाणी पुरवठा योजना राबविण्यासाठी सहकार्य घेण्याच्या अटींवर हा दाखला दिला होता. त्यादृष्टीने योजनेच्या मंजुरीचे कामही सुरू आहे. पण वर्षभरानंतर आता ग्रामस्थांचा याला विरोध झाल्याने संबंधित कन्स्ट्रक्शनला हा प्रकल्प बंद करण्याचे पत्र ग्रामपंचायतीतर्फे दिले आहे. ग्रामस्थांनी गैरसमज करून घेऊ नये.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91215 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..