इकोफ्रेंडली गणपती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इकोफ्रेंडली गणपती
इकोफ्रेंडली गणपती

इकोफ्रेंडली गणपती

sakal_logo
By

लोगो ः शनिवार (ता. २७) च्या टुडे पान १ वरील वापरावा
-
46170, 46132
-
46136 ( पोटात मोठा वापरणे
-

बालमित्रांनी साकारले ‘इकोफ्रेंडली बाप्पा’
सकाळ -एनआयईच्या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २८ ः ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर करतच मुलांनी शाडूच्या मातीला आकार देण्याचे काम सुरू केले. त्यांच्या सोबतीला त्यांचे पालकही होते. मार्गदर्शक जसे सांगतील त्या पद्धतीने मुलांनी शाडूच्या मातीवर आपली कलाकारी केली. गणपतीची सोंड, हात-पाय, पोट, मोदक तयार करून त्यापासून छोटीशी गणपतीची मूर्ती तयार झाल्यानंतरचा नवनिर्मितीचा आनंद या ‘बालमित्रांच्या’ चेहऱ्यावर झळकत होता. निमित्त होते, सकाळ माध्यम समूहाच्या न्यूजपेपर इन एज्युकेशन- एनआयई आयोजित इकोफ्रेंडली गणपती कार्यशाळेचे.
दरम्यान, डीवायपी सिटी प्रस्तुत या कार्यशाळेसाठी माधव मिशन सहप्रायोजक होते. या कार्यशाळेला विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. डीवायपी सिटी मॉलमध्ये ही कार्यशाळा झाली. सकाळी आठ ते अकरा या वेळेत दळवीज आर्टस्‌ इन्स्टिट्यूशनच्या विद्यार्थ्यांनी गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. मूर्ती कशी तयार होते, याचे प्रात्यक्षिक दाखवत त्यांनी या मुलांना मूर्ती तयार करण्यास सांगितले. विद्यार्थ्यांनीही मग्न होऊन मूर्ती तयार करताना त्याच्या सजावटीकडेही लक्ष दिले. एरवी कुंभार गल्ल्यांमध्ये तयार गणपती पाहणाऱ्या या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातांनी इको गणपतीची मूर्ती साकारण्याचा अनुभव घेतला.
डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी ‘सकाळ’च्या उपक्रमाचे कौतुक केले. या वेळी माधव मिशनचे डॉ. आशुतोष देशपांडे, डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी श्रीलेखा साठम, ‘सकाळ’चे उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर, वितरण व्यवस्थापक महेश डाकरे उपस्थित होते. रोहित गायकवाड, आर्या माने, श्रृती पार्ले, अंजली कांबळे, आदित्य संपकाळ व कशिस पटेल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. एनआयईचे समन्वयक उदय माळी, सूरज जमादार, अवधुत गायकवाड, अमोल यादव यांनी संयोजन केले.
-------
यांनी साकारले सर्वोत्कृष्ट ‘बाप्पा’
प्रथम ः श्रावणी बागी
द्वितीय ः तृप्ती स्वामी
तृतीय ः विराज वडणे
चौथा ः स्वराराजे शिंदे
-----------------
कोट
(फोटो शनिवार (ता. २७) च्या टुडे पान १ वरील वापरावा.)
-
कोल्हापूरची ओळख ‘कलापूर’ अशी का आहे, याची झलकच या इकोफ्रेंडली गणपती कार्यशाळेत पाहायला मिळाली. प्रत्येकांने वेगळ्या पद्धतीने गणेश साकारला आहे. यशस्वी व्यक्ती वेगळ्या पद्धतीने काम करतात म्हणूनच ती यशस्वी होतात. आज जसे या मुलांनी वेगळ्या पद्धतीने गणेशमूर्ती साकारली, त्याचपद्धतीने तुम्ही आयुष्यात वेगळ्या पद्धतीने कार्य करा, निश्चितच यशस्वी व्हाल. ‘सकाळ’च्या अशा पर्यावरणपूरक, सामाजिक उपक्रमांमुळेच डी. वाय. पाटील ग्रुप आणि ‘सकाळ’चे नाते आणखी घट्ट होत आहे.
-आमदार ऋतुराज पाटील,
विश्‍वस्त, डॉ. डी. वाय. पाटील ग्रुप
......
कोट
(फोटो शनिवार (ता. २७) च्या टुडे पान १ वरील वापरावा.)

आजचा ‘सकाळ’चा इकोफ्रेंडली गणपती कार्यशाळा हा कार्यक्रम कोल्हापूर हे कलापूर कसे आहे, याची साक्ष देत होता. मुलांचा या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद आणि त्यांचा उत्साह पाहून आपली संस्कृती किती महान आहे, हे लक्षात येते. असे उपक्रम राबवून ‘सकाळ’चा पुन्हा लोककलांना ऊर्जितावस्था देण्याचा प्रयत्न यशस्वी होतो आहे, अशा कार्यक्रमांना माझा सक्रिय पाठिंबा राहील. ‘सकाळ’चे आणि लहानग्या कलाकारांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
डॉ. आशुतोष देशपांडे, माधव मिशन
....
46175
सकाळ माध्यम समूहाने आयोजित केलेली कार्यशाळा विद्यार्थ्यांमध्ये समानता, पर्यावरण संवर्धन, पर्यावरणपूरक विचार, विविधतेत एकता अशी अनेक मूल्य रुजवणारी होती. सर्व विद्यार्थ्यांसाठी साधनांची उपलब्धता व व्यक्त होण्याची संधी देऊन प्रत्यक्ष अनुभवातून ताणविरहित सहजशिक्षणाची पूर्तता करण्यासाठी एक सुंदर उपक्रम आयोजित केल्याबद्दल व नरके पन्हाळा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना संधी दिल्याबद्दल आभारी आहोत.
- महेश्वरी चौगुले, प्राचार्या, नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूल व डिफेन्स ॲकॅडमी

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91224 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..