सुट्टीच्या दिवशीही जिल्हा बॅंकेत गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुट्टीच्या दिवशीही जिल्हा बॅंकेत गर्दी
सुट्टीच्या दिवशीही जिल्हा बॅंकेत गर्दी

सुट्टीच्या दिवशीही जिल्हा बॅंकेत गर्दी

sakal_logo
By

सुटीच्या दिवशीही
जिल्हा बॅंकेत गर्दी

प्रोत्साहनपर रकमेसाठी आधार लिंक सुरू

कोल्हापूर, ता. २८ : प्रामाणिकपणे पीककर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जात आहे. यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे (केडीसीसी) सर्व कर्मचारी आणि अधिकारी आज रविवारी सुटीच्या दिवशीही शेतकऱ्यांच्या बॅंक खात्याला आधार नंबर लिंक करण्याचे काम करत आहेत. त्यामुळे आज सुटीच्या दिवशीही जिल्हा बॅंकेत ग्राहकांची गर्दी झाली.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक कर्जपुरवठा जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून झाला आहे. जुन्या पद्धतीने बॅंकेत खाती सुरू केली. त्यावेळी अनेक शेतकऱ्यांचे आधारकार्ड नव्हते. आता ही कार्ड लिंक करणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हा बॅंकेचे कर्मचारी, अधिकारी व्यस्त आहेत. प्रत्येक शाखा व गावनिहाय येणाऱ्या ग्राहकांकडून आधार कार्डचे लिंकिंग केले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या हिश्‍श्‍‍याची रक्कम थेट बॅंक खात्यावर जमा करता येणार आहे. जिल्ह्यातील ९० टक्के शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड केली आहे. सुमारे ४ लाख ५० हजारांहून अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल, असा अंदाज आहे. मंगळवार (ता. ३०) पर्यंत ही सर्व काम पूर्ण केले जाणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91231 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..