शालेय नाट्यछटा स्पर्धमध्ये नाईक, पोतदार, कांबळे प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शालेय नाट्यछटा स्पर्धमध्ये 
नाईक, पोतदार, कांबळे प्रथम
शालेय नाट्यछटा स्पर्धमध्ये नाईक, पोतदार, कांबळे प्रथम

शालेय नाट्यछटा स्पर्धमध्ये नाईक, पोतदार, कांबळे प्रथम

sakal_logo
By

शालेय नाट्यछटा स्पर्धेत
नाईक, पोतदार, कांबळे प्रथम
आजरा, ता. २८ : येथील श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरातर्फे आयोजित शालेय नाट्यछटा स्पर्धेत प्राथमिक गट (पहिली ते चौथी) संस्कार सुभाष नाईक (विद्यामंदिर सुलगाव), प्राथमिक गट (पाचवी ते सातवी) गटात वेदिका विजय पोतदार (आजरा हायस्कूल, आजरा) व माध्यमिक गट (आठवी ते दहावी), आर्यन तुकाराम कांबळे (आजरा हायस्कूल, आजरा) यांनी प्रथम क्रमांक पटकावले. शालेय वक्तृत्व स्पर्धेत प्राथमिक गट (पाचवी ते सातवी) सिमरन भिकाजी पाटील (व्यंकटराव हायस्कूल, आजरा), माध्यमिक गट (आठवी ते दहावी), वैदेही शिवाजी तांबेकर (कर्मवीर विद्यालय, चिमणे) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. (कै.) शुभांगी गजानन वायंगणकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शालेय वक्तृत्व स्पर्धा, तर (कै.) पांडुरंग बीडकर (गुरुजी) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शालेय नाट्यछटा स्पर्धा येथील गंगामाई वाचन मंदिरात झाल्या.
अन्य विजेते असे ः शालेय नाट्यछटा स्पर्धा- प्राथमिक गट (पहिली ते चौथी), स्वरा सुजय पाटील (अण्णा भाऊ इंग्लिश स्कूल), संस्कार उमाजी कुंभार (विद्यामंदिर सुलगाव). प्राथमिक गट (पाचवी ते सातवी)- आराध्या सुरेंद्र बेळगुंदकर (सरस्वती हायस्कूल, हातीवडे), युविका अमर पोवार (पंडित दीनदयाळ हायस्कूल, आजरा). माध्यमिक गट (आठवी ते दहावी)- ऋतुजा रघुनाथ धडाम (चाफवडे हायस्कूल, चाफवडे), स्वर्णिका नितीन पाटील (पार्वती शंकर विद्यालय, उत्तूर). शालेय वक्तृत्व स्पर्धा ः प्राथमिक गट (पाचवी ते सातवी), मानसी लक्ष्मण चौगुले (व्यंकटराव हायस्कूल), खदिजा शहानवाज मुल्ला (आजरा हायस्कूल). माध्यमिक गट (आठवी ते दहावी)- रिया मारुती वाघे (कर्मवीर विद्यालय, चिमणे), श्रुती आनंदा कांबळे (पं. दीनदयाळ विद्यालय, आजरा) यांनी अनुक्रमे क्रमांक पटकावले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91245 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..