संघर्षाला धार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संघर्षाला धार
संघर्षाला धार

संघर्षाला धार

sakal_logo
By

महाडिक-पाटील संघर्षाला पुन्हा धार
....................
‘गोकुळ’चे निमित्त ः आगामी सर्वच निवडणुकींत उमटणार पडसाद
..................
निवास चौगले ः सकाळ वृत्तसेवा,
कोल्हापूर, ता. २८ ः कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) कारभारावरून खासदार धनंजय महाडिक व माजी मंत्री सतेज पाटील यांच्यातील राजकीय संघर्षाला पुन्हा एकदा धार आली आहे. या दोघांतील संघर्षाचे पडसाद आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीसह नगरपालिका व महापालिकेच्या निवडणुकीत उमटणार आहेत. लोकसभेनंतरच्या सर्वच निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर महाडिक गट काहीसा राजकीयदृष्ट्या ‘बॅकफूट’वर गेला होता; पण जूनमध्ये झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत खासदार महाडिक यांचा झालेला विजय आणि त्यानंतर राज्यातील सत्तांतरामुळे या गटाला जिल्ह्यात पुन्हा उभारी मिळाली आहे.
त्या जोरावर श्री. महाडिक यांच्याकडून संधी मिळेल तिथे माजी मंत्री पाटील यांना शह देण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याला ‘गोकुळ’ची वार्षिक सर्वसाधारण सभा निमित्त ठरली आहे.
विमानतळ विस्तारीकरण, बास्केट ब्रीजसह जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्‍नांबाबत पहिल्याच महिन्यात संबंधितांना निवेदन देऊन श्री. महाडिक यांनी कामाला सुरुवात केली आहे. दोन वर्षांनंतर झालेल्या युवाशक्तीच्या दहीहंडीच्या कार्यक्रमात श्री. महाडिक यांनी पहिल्यांदा थेट सतेज पाटील यांना डिवचले. येथून पुढे आम्ही महाभारत करू, असे सांगून त्यांनी इरादा स्पष्ट केला. त्याला श्री. पाटील यांनी प्रत्युत्तर देताना ‘आम्ही रामायण घडवणारी माणसे असल्याचे’ सांगितले. उद्या (ता. ९) होणाऱ्या ‘गोकुळ’ च्या सभेतही ‘महाभारत’ आणि ‘रामायण’ चा पहिला अंक पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
‘गोकुळ’ हे जिल्ह्याचे प्रमुख अर्थिक सत्ता केंद्र आहे. या सत्ताकेंद्रावर अनेक वर्षे महादेवराव महाडिक यांची सत्ता होती. या सत्तेच्या जोरावरच श्री. महाडिक यांनी जिल्ह्याच्या राजकारणात स्वतःचा दबदबा निर्माण केला होता. या सत्ताकेंद्राला श्री. पाटील व माजी मंत्री हसन मुश्रीफ जोडगोळीने गेल्यावर्षी सुरूंग लावला. त्यानंतरच या दोघांतील संघर्षाला सुरुवात झाली होती; पण पाटील-मुश्रीफ सत्तेत आणि महाडिक विरोधी गटात असल्याने आरोप-प्रत्यारोपाशिवाया महाडिक गटासमोर पर्याय राहिला नव्हता. आता श्री. महाडिक खासदार झाले, पाटील-मुश्रीफ सत्तेतून पायउतार झाले आणि राज्यात सत्तांतर झाले. त्यातून वाढलेली राजकीय ताकद
श्री. महाडिक यांच्यादृष्टीने महत्त्वाची आहे. त्या जोरावरच त्यांनी पुन्हा श्री. पाटील यांच्याविरोधात शड्डू ठोकला आहे.
...............

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91249 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..