परम कृपाळू श्री साई अल्बमचे प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परम कृपाळू श्री साई अल्बमचे प्रकाशन
परम कृपाळू श्री साई अल्बमचे प्रकाशन

परम कृपाळू श्री साई अल्बमचे प्रकाशन

sakal_logo
By

46173

परम कृपाळू श्री साई
अल्बमचे अनावरण

कोल्हापूर ः पूजा सावंतनिर्मित परम कृपाळू श्री साई, या अल्बमचे प्रकाशन नुकतेच जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते झाले. प्रादेशिक परिवहन विभागाचे निवृत्त वरिष्ठ मोटार वाहन निरीक्षक पी. डी. सावंत यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या अल्बमची गीते अंतरंगचे प्रमुख संगीतकार महेश हिरेमठ यांनी स्वरबद्ध केली आहेत. या गीतांना पद्मश्री सुरेश वाडकर, उत्तरा केळकर, सुवर्णा माटेगावकर, स्वरदा गोडबोले या दिग्गज गायकांसमवेत प्रतीक सावंत, साईश सावंत यांचा स्वरसाज लाभला आहे. मुंबईतील आजीवासन, बजरंग आणि कोल्हापुरातील सोनी रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये या गीतांचे ध्वनिमुद्रण झाले आहे. अल्बम प्रकाशनावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, अमोल कोरगांवकर, अजयसिंह देसाई, पी. डी. सावंत, पूजा सावंत, ललिता सावंत, आरती सावंत उपस्थित होते. हिरेमठ व शुभांगी जोशी यांनी भक्तीगीत सादर केले. शुभदा हिरमेठ यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91263 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..