खपली गहू स्यस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खपली गहू स्यस्त
खपली गहू स्यस्त

खपली गहू स्यस्त

sakal_logo
By

46200
कोल्हापूर : श्री अंबाबाई मंदिर परिसरात खपली गहू घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी दिसत आहे. (सर्व छायाचित्रे : अमोल सावंत)

खपली गहू झाला स्वस्त !
मंडईतही गणशोत्वाचा माहोल; गुळ, शेंगदाणा, शाबू, मैदा तेजीत

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २८ : ३१ ऑगस्टला येणाऱ्या गणेश आगमनाच्या पाश्‍‍र्वभूमीवर महाद्वार रोड, श्री अंबाबाई मंदिर, लक्ष्मीपुरी, शिवाजी मार्केट, पापाची तिकटी, मिरजकर तिकटीबरोबर उपनगरातील मंडई परिसरात खपली गव्हाची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. श्री गणेशाचे घरात आगमन झाले की, नैवेद्याचा पहिला मान हा खपली गव्हाच्या खिरीला अन्‌ पाच फळांना असतो. मग पहिली आरती केली जाते.
अन्य वेळेला हा खपली गहू १०० रुपये किलो अशी विक्री सुरु असते. मात्र या खपली गव्हाचे उत्पादन जास्त झाल्याने सध्या तो ८० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. हे झाले किराणा मालाच्या दुकानातील दर. मंडई परिसरात खपली गहू विक्रीसाठी ग्रामीण भागातील अनेक महिला आल्या आहेत. या महिला १० किंवा २० रुपये कोळव्याने खपली गहू देत आहेत. विशेष म्हणजे, अनेक कंपन्यांनी खपली गव्हाची पाकिटे बाजारात आणली आहेत. यामध्ये १०० ग्रॅमचे पाकिट ६५ रुपयाला तर खिरीसाठी शेवया १०० ते ११० रुपये किलोने विक्री सुरू आहे. खिरीसाठी प्रामुख्याने साखरेपेक्षा गुळ अधिक प्रमाणात वापरला जातो. असा हा गुळाचा दर ५० रुपये किलो होता. गणेश चतुर्थीच्या पाश्‍‍र्वभूमीवर हाच गुळाचा दर ६० रुपये किलोने झाला. शेंगदाणा, शाबू, मैद्याचे दरही तेजीत आले आहेत. दसरा, दिवाळीपर्यंत हे दर कमी होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. सध्या गव्हाचे दर हे ३० ते ४० रुपये किलोपर्यंत गेल्याने रवा, मैदा, बेकरी प्रॉडक्टस्‌च्या दरात वाढ झाली.
...
चौकट
वाढलेले दर (प्रतिकिलो रुपये)
पूर्वीचा दर*आताचा दर
शेंगदाणा*१००/११०*१३०/१४०
ाशाबूदाणा*६०*८०
मैदा/रवा/आटा*३६*३८
...
चौकट
खाद्यतेलाचे दर‌ (प्रतिकिलो/प्रतिलिटर)
सरकी*१६४
शेंगतेल*१९६
सुर्यफुल*२००
सोयाबीन*१५४
लाकडी घाणा शेंगतेल*३१०
लाकडी घाणा करडई*३१०
लाकडी घाणा सनफ्लॉवर तेल*३१०
...
चौकट
धान्य-कडधान्ये दर(प्रतिकिलो)
हिरवा मूग *१००
जवारी मटकी *१५०
उंची गहू ते बन्सी गहू *३४ ते ४४
तुरडाळ *११५/१२०
हिरवा वाटाणा *८०/९०
काळा वाटाणा *८०
अखंड हरबरा *७०
हरबरा डाळ *७५/८०
उडीद डाळ *१२०
अखंड उडीद *८०
मुग डाळ *१००/११०
मसुर डाळ *१००
अखंड मसूर *९०/१००
बेळगावी मसूर *२८०
पावटा *१६०
हुलगा (सफेद कुळीथ) *८०/९०
पांढरी चवळी *१००
काळा घेवडा *८०
...
ठळक चौकट
साखर : ३६०० रुपये क्विंटल
साखर : किरकोळ दर : ३८ रुपये किलो
--
ठळक चौकच
सोने-चांदीचे दर अपडेटस्‌ (प्रतिकिलो/प्रतितोळा) (रविवारी सायंकाळी साडेपाच पर्यंत घेतलेले दर)
सोने-५२, ९९० प्रतितोळा
चांदी- ५४,८०० प्रतिकिलो
...........................
46221
कोल्हापूर : गणेश आगमन झाल्यानंतर अन्‌ देव्हाऱ्यातील देवांसाठी फुले घेण्यासाठी अशी गर्दी झालेली दिसते

गणेश चतुर्थी आली; फुले महाग झाली...
कोल्हापूर, ता. २८ : गणेश चतुर्थी आली अन्‌ पूजेसाठी असणारी सर्व फुले महाग झाली. प्रति पावशेरचा दरच ५० ते ७० रुपये किलोपर्यंत पोहोचला. ही सर्व फुले जशी, जिल्ह्यातून येतात, तशाच पद्धतीने गलाटासारखी फुले ही पॉलीहाऊसमधून बाजारात येतात. पॉलीहाऊसमधून आली की, दरात वाढ होते. म्हणजे, फुल विक्रेत्यांनी शेतकऱ्यांकडून किंवा पॉलिहाऊसमधून घेतलेला दर आणि विक्री, अशी गणित पाहिले तर विक्रीच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळते. यामध्ये फुल विक्रेता हा फुलांची तूट, रोड ट्रान्स्पोर्ट, हमाली, महापालिका टॅक्स आदीतून प्रतिकिलो दर ठरवितो. दुसरे असे की, कोणताही सण आला की, दरात वाढ केली जाते.
...
फुलांचे दर :
केवडा कणीस *२००/२५०
केवड्याने पाने *२० रुपयाला पेंडी
रंगीबेरंगी शेवंती *७० रुपये पावशेर
गलाटा *८० रुपये पावशेर
पिवळा-शेंदरी झेंडू *२० रुपये पावशेर
मिरची फुले *१०/२० रुपये प्लेट
निलींबो कपळ (निळे/गुलाबी) *१० रुपयाला एक
गौरी फुले *५० रुपये किलो
निशिगंध *२५० रुपये किलो
हरेटी-आघाडा पेंडी *१० रुपये
तुळस जोडी *४०/५० रुपये
बिल्वदल *१० रुपये
..................................
46223
कोल्हापूर : कपिलर्ती मंडईत भाजी घेण्यासाठी झालेली गर्दी.


काटे काकडीचे दर वाढले
कोल्हापूर, ता. २८ : श्री गणेश मूर्तीसमोर जेव्हा आरास उभी केली जाते, तेव्हा आराशीसमोर फळे, फुले, पानांची माळ उभी केली जाते. या माळेत काटे काकडी, कवंडाळ फळ माळले जाते. याबरोबर गौरी गणपतीला जेव्हा ववसे (ओटी) पूजले जातात, तेव्हा काटे काकडीला अपार महत्व असते. त्यामुळे ववशे जरी दोन ते तीन दिवसांनी असले तरी काटे काकडीच्या दरात वाढ झाली. शेतकरही ववशाच्या पाश्‍‍र्वभूमीवर काटे काकडीचा माल आणत नाहीत, ववशाच्या आधी दोन दिवस ही काकडी बाजारात येते. सध्या या काकडीची आवक कमी झालेली पाहायला मिळाली. ही काकडी घेण्यासाठी गर्दी दिसत होती. प्रत्येकाच्या भाजीच्या पिशवीत ही काकडी दिसत होती.


फळभाजी दर (प्रतिकिलो रुपये)
काटे काकडी *५०
हिरवा वाटाणा *१००
फ्लॉवर *४० रुपये प्रतिनग
ढब्बू मिरची *६०
बिनिस *८०
शेवगा *१० रुपये पेंडी
भेंडी *८०
काळी वांगी *४०
हिरवी वांगी *६०
वाल शेंग *८०
कांदा *२०
इंदूरी बटाटा *३०
्आल्लं *६०
देशी गवारी *१२०
बंदरी गवारी *८०
टोमॅटो *१५/२०
लिंबू *१० रुपयाला पाच नग
स्वीट कॉर्न *१० रुपयाला एक नग
हिरवी मिरची *६०
कारली *४०
लाल बीट *१०
तोंदली *८०
बेळगावी गाजर *६०
सुरण गड्डा *८०
आळू गड्डा *८०
कच्ची केळी *५० रुपये डझन
मुळा *१५ रुपयाला दोन/दहा रुपयाला दोन नग
श्रावण घेवडा *६०
काळा घेवडा *८०
पापडी शेंग *६०
...
पालेभाजी दर (प्रति पेंडी दर)
मेथी *२०/२५
कोथींबीर *२०
कांदापात *१५
पालक *१५
करडई *१०
आंबाडा *१०
चुका *१०
तांदळी *१०
लाल माट *१०
पोकळा *१०
राजगिरा *१०
शेपू *१०
...............................
बजारात फळे भरपूर
कोल्हापूर, ता. २८ : गणपती बाप्पासाठी फळांचा नैवैद्य ही महत्वाचा. यासाठी अधिक प्रमाणात फळे आली आहेत. सीमला सफरचंदाचे ढिग दिसत आहेत. केळींच्या दरात मात्र घसरण झालेली दिसते. एरव्ही जवारी केळीचा दर ७०/८० रुपये डझन होता, तोच दर आता ४०/५० रुपये डझनांपर्यंत आला; तर साधी केळ्याचा दर ३५/४० रुपयांवरुन २०/२५ रुपयांपर्यंत आला. याबरोबर, देशी पेरु, थायलंड पेरुंनी जर अखंड बाजार कबीज केला आहे. विशेष म्हणजे, हे पेरु घेण्यासाठी लोकांची गर्दीही दिसते. पेरु आरोग्याला चांगला म्हणून तर घेण्याचे प्रमाण ही वाढले.

चौकट
फळांचे दर (प्रतिकिलो रुपये)
डाळीबं *११०/१५०
पपई *३०/५० रुपये प्रतिनग
मोसंबी *१००
सीताफळ *१००
सीमला सफरचंद *५०/१५०
माल्टा संत्री *२००
किवी *८०/१००
कवठ *२० रुपयाला एक नग
ड्रॅगन फ्रुट *५०/१००
थायलंडची गोड चिंच *१०० रुपये पॅकेट
म्हाळुंग फळ *१५०/२००
गणेश पूजेसाठी पाच फळे *८०/१००
जवारी केळी *५०/६० रुपये डझन
साधी केळी *२०/३० रुपये डझन

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91288 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..