कुंभारवाड्यांत लगबग, घरोघरी तयारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुंभारवाड्यांत लगबग, घरोघरी तयारी
कुंभारवाड्यांत लगबग, घरोघरी तयारी

कुंभारवाड्यांत लगबग, घरोघरी तयारी

sakal_logo
By

46199
आजरा : मुर्तीवर शेवटचा हात फिरवण्यात मग्न कलाकार.

कुंभारवाड्यांत लगबग, घरोघरी तयारी
आजऱ्यातील चित्र; बाजारपेठेत सजावटीचे साहित्य खरेदीसाठी गर्दी
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. २८ : बाप्पाच्या मुर्तीवर अखेरचा हात फिरवण्यासाठी कलाकार मग्न आहेत गणेशाचे आगमन दोन दिवसांवर आल्याने कुंभारवाड्यात भलतीच लगबग सुरु आहे. बाहेरगावी जाणाऱ्या तयार मुर्ती टेम्पोमधून पाठवल्या जात आहेत. तर दुसरीकडे गणरायाचे जल्लोष्षी स्वागत करण्यासाठी घरोघरी जय्यत तयारी सुरू आहे. घराची स्वच्छता करण्यापासून रंगरंगोटीला जोर आला आहे. मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मंडप उभारणीच्या कामात व्यस्त आहेत. कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालावधीनंतर यंदा मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होणार असल्याने आजरेकरांनी गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे.
आजरा तालु्क्यात सुमारे पंचवीस हजार लहान मोठ्या गणेश मुर्ती तयार केल्या जातात. यंदा सरकारने पर्यावरणपुरक साडूच्या मुर्ती तयार करण्यासाठी परिपत्रक काढले आहे. त्यामुळे बहुतांश कलाकरांना शाडू मुर्ती तयार करण्यावर जोर आहे. तालुक्यातून गोवा, बेळगाव, सांगली, कराड, वाई यासह कोकणात गणेश मुर्तींना मोठी मागणी असते. या मुर्ती संबंधीत गावाकडे रवाना होत आहे. यंदा रंगाचे व मजुरीचे दर वाढले वाढल्यामुळे मुर्तीमध्ये वीस टक्के वाढ सुचविली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्याने मुर्ती वाळवण्यासाठी कलाकारांना कष्ट उचलावे लागले. आजरा शहरात पंचवीस कुंभार कुटुंबाकडे मुर्तीकाम सुरू असून सुमारे दहा हजार लहान मोठ्या मुर्ती तयार केल्या आहेत. यापैकी चाळीस टक्के मुर्ती बाहेरगावी विक्रीसाठी निघाल्या आहेत. त्याचबरोबर तालुक्यात भादवण, उत्तूर, साळगाव, मडिलगे, वेळवट्टी, सिरसंगी, सुलगाव, वाटंगी, हातीवडे, होन्याळी या गावात गणपती तयार केले जातात. सुमारे पंधरा हजार मुर्ती तयार केल्या आहेत. दरम्यान, सजावटीचे साहित्य खरेदीसाठी आजरा, उत्तूर शहरात गर्दीचे चित्र आहे. बाजारात इलेक्ट्रीक, सजावटिचे साहित्य, फटाके, किराणा व वाण सामान, मकर (आरास) चे साहित्याची मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे. मंडळांनी मंडप उभारण्याचे काम सुरु केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91289 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..