बावडा बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बावडा बातमी
बावडा बातमी

बावडा बातमी

sakal_logo
By

‘भारतवीर’चा देखावा
दिव्यांगांना समर्पित

५ सप्टेंबरपासून पाहण्यासाठी खुला

कसबा बावडा, ता. २८ ः येथील चौगले गल्लीतील भारतवीर मित्रमंडळातर्फे यावर्षीचा देखावा दिव्यांगांना समर्पित करण्यात आला असून, देखाव्याच्या माध्यमातून दिव्यांगांना येणाऱ्या अडचणी व त्यातून त्यांनी काढलेला मार्ग यातून प्रेरणा मिळेल, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष दीपक भोसले व दिग्दर्शक मानसिंग जाधव यांनी दिली. ५ सप्टेंबरपासून हा सजीव देखावा लोकांना पाहण्यासाठी खुला करण्यात येणार आहे.
दरम्यान, या देखाव्याच्या प्रोमोचे अनावरण आज मान्यवरांच्या हस्ते झाले. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं,’ असे या देखाव्याचे नाव आहे.
अपेक्षांच्या ओझ्याखाली दबलेला आजचा तरूरुण नकारात्मकतेकडे वळत आहे. अशा तरुणांना मार्गदर्शनाची गरज आहे. समाज काय म्हणेल, या विचाराने झगडताना दिसत आहे. पण, हाच तरुण जेव्हा आश्रमशाळेत जातो, तेव्हा तेथील दिव्यांग व्यक्तींकडून प्रेरणा घेतो. प्राप्त परिस्थितीत जीवन कसे जगायचे हे शिकतो, यावर या देखाव्यातून प्रकाशझोत टाकला आहे.
उपाध्यक्ष अनिकेत जाधव, सचिव राहुल भोसले, खजानिस अमित जाधव, सुनील पोवार, सचिन चौगले, भगवान चौगले, अभिजित जाधव आदींसह दिव्यांग बांधव व त्यांचे पालक उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91325 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..