एसटी गणेशोत्सव मोफत प्रवास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसटी गणेशोत्सव मोफत प्रवास
एसटी गणेशोत्सव मोफत प्रवास

एसटी गणेशोत्सव मोफत प्रवास

sakal_logo
By

कोकणवासीयांना मोफत
एसटी प्रवासाचा लाभ

महामंडळाला साडेसात कोटींचा महसूल

शिवाजी यादव ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २८ ः गणेशत्सवाला कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी एसटी महामंडळाकडून यंदा तीन हजार ४५० जादा गाड्यांची सोय केली. यात भाजप व शिवसेना शिंदे गटानेही गाड्यांचे बुकींग केले. प्रवाशांचे पैसेही पक्षीय नेत्यांनी भरले आहेत. त्यामुळे कोकणवासीयांना यंदाच्या गणेशउत्सवाचा प्रवास मोफत घडणार आहे. यातून एसटीला जवळपास साडे सात कोटींचा महसुल मिळेल असा अंदाज आहे. त्यामुळे यंदा प्रवाशांना गणेशोत्सवाच्या प्रवासाचा प्रसाद मोफत मिळाला आहे.
गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाण्यासाठी व कोकणातून परत मुंबईत येण्यासाठी दुहेरी प्रवासांसाठी एसटी महामंडळ दरवर्षी दोन ते अडीच हजार गाड्यांचे नियोजन करते. त्यानुसार यंदाही एसटी महामंडळाने तेवढ्याच गाड्याचे नियोजन केले होते. मात्र, गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे उत्सवाला आलेल्या मर्यादांमुळे फारसे लोक कोकणात उत्सवासाठी गेले नव्हते. त्यामुळे जेमतेम गाड्या सोडल्या होत्या. जेमतेम महसूल मिळाला होता. यंदा मात्र कोरोनानंतर पहिल्यांदाच उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत आहेत. यात मुंबई महापालिकांच्या निवडणुका तसेच राज्यात भाजप विरूद्ध शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस असे तापलेले वातावरण या पार्श्वभूमीवर कोकणवासीयांची मने जिंकण्यासाठी पक्षीय नेत्यांत स्पर्धा लागली.
मुंबईतील काही नगरसेवक, आमदार व खासदारांनीही आपापल्या पक्षाच्या वतीने स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या नावे एसटी गाड्याचे बुकींग केले. त्यानुसार पक्षाचे बॅनर लावून एसटी गाड्या कोकणाच्या मार्गावर जाऊ लागल्या आहेत. या गाड्यांतून कोकणवासीयांना मोफत प्रवास होत आहे. त्यांच्या प्रवासाचे पैसे नेत्यांनी एसटीला अगावू भरले आहेत. असा जवळपास ९०० गाड्या वाढवल्या आहेत. त्यामुळे एसटीचा एकूण सात दिवसाच्या प्रवासात साडेसात कोटीचा महसूल मिळेल अशी अपेक्षा आहे.
कोकणवासीयांच्या प्रवासाचीही सोय मोफत झाली. हे जरी खरे मानले तरी राज्यभरातील अन्य जिल्ह्यातून जवळपास १८०० गाड्या मागविल्या आहेत. कोल्हापूरातून १३० गाड्या मुंबई-कोकण सेवेसाठी गेल्या. या गाड्या कोल्हापुरातून मुंबईला जाताना केवळ दहा बारा प्रवासी घेऊन गेल्या. येतानाही तेवढेच प्रवासी घेऊन कोल्हापूराला गाड्या येतील तसेच या गाड्या सात दिवस स्‍थानिक सेवेत असणार नाहीत. हा सर्व एसटीचा हक्काचा महसूल बुडणार आहे. तो अंदाजे दहा कोटीच्या घरात जाणारा आहे. मात्र, सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून एसटीने हाही तोटा सोसत कोकणवासीयांना सणासाठी यंदा ५०० हून अधिक गाड्या जास्त दिल्या आहेत.


कोट
यंदाच्या गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने प्रवासी कोकणात जात आहेत. त्यासाठी ३ हजार ४५० च्या एसटीच्या गाड्यासेवेत आहेत. एसटीचे दहा हजार अधिकारी कर्मचारी सुरक्षित प्रवासाचे नियोजन करत आहेत. यंदा काही राजकीय पक्षांनी गाड्यांची नोंदणी केली. त्याचे पैसेही महामंडळाला भरले. त्यामुळे महसूलात वाढ होईल. अंदाजे साडे सात कोटीचा महसूल मिळेल. त्यासोबत प्रवाशांचा सुरक्षित प्रवास घडावा एसटीने सक्षम नियोजन केले आहे.
-शिवाजी जगताप, वाहतूक महाव्यवस्थापक, एसटी महामंडळ

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91329 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..