ईपीक पाहणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ईपीक पाहणी
ईपीक पाहणी

ईपीक पाहणी

sakal_logo
By

ई-पीक फोटो
ई-पीक नोंदणीत कोल्हापूर विभागात दुसरे
..................
५० हजार नोंदी पूर्ण ः चंदगड तालुक्यातील दक्षिण हट्टीत १०० टक्के नोंदणी
................
कोल्हापूर, ता. २८ ः शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतातील पिकांची नोंदणी सात-बारा पत्रकी स्वतःच करण्यासाठी चार दिवसांपासून राबवलेल्या राज्य शासनामार्फत ई-पीक अभियानात कोल्हापूर जिल्हा पुणे विभागात दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ५१ हजार तर कोल्हापूर जिल्ह्यात ५० हजार ई-पीक नोंदणी झाली आहे. दरम्यान, चंदगड तालुक्यातील दक्षिण हट्टी गावांत या अभियानांतर्गत शंभर टक्के नोंदणी झाली. या गावांत ६५० खातेदार आहेत, या सर्वांनी शेतात जाऊन पिकांची नोंदणी पूर्ण केली. १५ ऑक्टोंबरपर्यंत ही मोहीम पूर्ण करायची आहे.
पूर्वी तलाठ्यामार्फत त्या-त्या गावातील शेतात कोणते पीक आहे याची नोंदणी केली जात होती. या नोंदणीवरून गावागावांत वादाचे प्रसंग उद्‌भवले होते. यावर मार्ग काढण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांनीच स्वतःच्या सात-बारा पत्रकी शेतातील पिकांची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी ई-पीक नोंदणी अभियान सुरू केले आहे.
राज्यात चार दिवसांपासून युद्धपातळीवर हे काम सुरू होते. यासाठी कॉलेज तरुणांनाही प्रशिक्षण दिले होते. ज्या शेतकऱ्यांना मोबाईल वापरता येत नाही.
त्या शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी अशा प्रशिक्षित तरुणांकडून केली. याला जिल्ह्यात उदंड प्रतिसाद मिळाला.
---
८ लाख ५० हजार खातेदार
जिल्ह्यात एकूण ८ लाख ५० हजार खातेदार आहेत. यापैकी ५० हजार खातेदारांनी पिकांची नोंदणी जीपीएस प्रणालीद्वारे शेतीच्या फोटोसह केली. ही संख्या कमी असली तरी या चार दिवसांत पुणे विभागातील पाच जिल्ह्यांच्या तुलनेत ही संख्या मोठी असल्याने या नोंदणी उपक्रमात कोल्हापूर विभागात दुसऱ्या क्रमांकावर आले आहे.
...........

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91374 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..