शौमिका महाडिक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शौमिका महाडिक
शौमिका महाडिक

शौमिका महाडिक

sakal_logo
By

गोंधळ न घालता अध्यक्षांनी
उत्तर द्यावीत; शौमिका महाडिक

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २८ ः कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाचे (गोकुळ)अध्यक्ष विश्वास पाटील यांनी दुधाला दिलेली ६ रुपये दरवाढ म्हणजे वचनपूर्ती नव्हे, हे त्यांनी मान्य केले आहे. त्यांनी त्यांच्या नेत्यांचा वचनपूर्तीचा दावा खोडून काढण्यावरच न थांबता वासाचे दूध परत देणे शक्य नसल्याची कबुलीही त्यांनी दिली, ज्यामुळे त्यांच्या नेत्यांची निवडणूक काळातील आमच्यावरील टीका चुकीची होती, हेही त्यांनी सिद्ध करत सर्व उत्तरे हास्यास्पद दिल्याचे निवेदन गोकुळ संचालिका शौमिका महाडिक यांनी आज दिले. दरम्यान, उद्या (ता.२९) होणाऱ्या गोकुळच्या वार्षिक सभेत गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना किंवा इतरांना पुढे न करता विचारलेल्या प्रश्नांची शांततेत उत्तर द्यावी, अशीही मागणी सौ. महाडिक यांनी केली.

निवेदनात म्हटले आहे, संस्थांची डिबेंचर्सची रक्कम, पशुखाद्य कारखान्यात झालेला तोटा, गरज नसताना घातलेला विस्तारीकरणाचा घाट, दुधाची खालावलेली प्रत, पशुखाद्याची ढासळलेली गुणवत्ता, जिल्ह्यातील संकलनात झालेली घट यांसारखे अनेक प्रश्न शिल्लक आहेत, ज्यांची नेमकी उत्तरे न देता अध्यक्षांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. याशिवाय अजून काही प्रश्न आहेत, ज्यांची विचारणा विविध संस्था प्रतिनिधी सभेत करतीलच. त्यासाठी सभेला अजूनही काही तास शिल्लक आहेत. उत्तरांची पूर्ण तयारी करून, अभ्यास करून मगच त्यांनी सभेला सामोरे जावे. कारण तिथे उत्तरे लिहून देण्यासाठी कोणी असणार नाही.
श्री. पाटील स्वतः इतकी वर्षे संघाचे संचालक होते, चेअरमन होते आणि आताही आहेत, तर त्यांना संघाच्या बाबतीत सर्व गोष्टींचे ज्ञान असणे अपेक्षित आहे. सभासदांच्या प्रश्नांना बगल न देता, दुसऱ्या लोकांना पुढे न करता, समर्थकांकडून गोंधळ न घालता त्यांनी प्रश्नांना उत्तर देणे अपेक्षित आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91377 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..