गोकुळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोकुळ
गोकुळ

गोकुळ

sakal_logo
By

सवंग लोकप्रियतेसाठी दिशाभूल
करू नका; विश्‍वास पाटील

कोल्‍हापूर, ता. २८ : संचालक मंडळाच्‍या बैठकीत बोलत नाहीत, उत्‍पादक हिताचे कोणतेही विषय मांडणात नाहीत, अशा ‘गोकुळ’च्या संचालिका शौमिका महाडिक यांनी त्‍यांना मान्‍य नसणाऱ्या प्रश्‍नाला बैठकीत कधीही विरोध केला नाही, केवळ त्या सभासदांची दिशाभूल करत आहेत. त्यांनी सवंग लोकप्रियेतेसाठी पत्रकबा‍जी करून प्रसिद्धी मिळवण्‍याचा प्रयत्‍न करू नये. त्यांचे प्रश्‍न अभ्‍यासपूर्वक आहेत का? ते त्यांनी तपासून पाहावे? असा सवाल ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्‍वास पाटील यांनी निवेदनाद्वारे केला आहे.
निवेदनात म्हटले आहे, जिल्ह्यातील लाखो दूध उत्पादक शेतकरी हे ‘गोकुळ’चे मालक आहेत. उन्हातान्हात राबून ‘गोकुळ’चे वैभव वाढविणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांशी आमची बांधिलकी आहे. त्यांच्या हिताला प्राधान्यक्रम देत संचालक काम करत आहेत. सोमवारी (ता. २९) होणाऱ्या वार्षिक सभेत सभासदांच्या सगळया प्रश्‍नांची उत्तरे देऊ, सभासदांचे समाधान होईपर्यंत सभा चालू राहील,
‘गोकुळ’चा विकास आणि विस्तार, दूध उत्पादकांचे हित हे आमच्या कामकाजाचे सूत्र आहे. संचालकांची काटकसरीचा कारभार करून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे जादा मिळावेत, ही भूमिका राहिली आहे. सत्तातंरानंतर दूध उत्पादकांना म्हैस दूध खरेदी दरात सहा रुपयांची व गाय दूध खरेदी दरात पाच रुपये वाढ केली. निवडणुकीत जी आश्‍वासने दिली होती, त्याची पूर्तता केली. आम्ही केवळ बोलणारे नाही तर सभासदाभिमुख कामकाज प्रत्यक्षात आणणारे आहोत. शेतकऱ्यांनी ४० वर्षे माझ्यावर विश्‍वास ठेवला आहे. त्यांच्या विश्‍वासाला पात्र राहून पुढेही काम करू. ‘गोकुळ’चा जो नावलौकिक आहे, त्याचे सारे श्रेय हे दूध उत्पादक शेतकऱ्यांना आहे. सभासदांना कामकाजाविषयी, योजनेबद्दल विचारण्याचा हक्क आहे. सभासदांनी जे जे प्रश्‍न विचारले जातील, त्या प्रश्‍नाची समाधानकारक उत्तरे देण्याची तयारी आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91390 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..