राजर्षी शाहू हायस्कूलमध्ये शाहीरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजर्षी शाहू हायस्कूलमध्ये शाहीरी
राजर्षी शाहू हायस्कूलमध्ये शाहीरी

राजर्षी शाहू हायस्कूलमध्ये शाहीरी

sakal_logo
By

46263
राजर्षी शाहू हायस्कूलमध्ये शाहीरी
इचलकरंजी : राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूल, विद्यानिकेतन व रोटरी क्लबतर्फे शाहीर विजय जगताप यांचा स्वातंत्र्य लढ्यातील राष्ट्रीय गीते हा शाहीरी कार्यक्रम झाला. शाहिरीची सुरुवात कीर्ती जगताप हीने गणेश वंदन गणाने केली. त्यानंतर देशभक्तीपर पोवाडे, गीते सादर केली. यानंतर शाहीर जगताप यांचा मुख्याध्यापक शंकर पोवार यांच्याहस्ते सत्कार केला. चंद्रकांत मगदूम, शितल चौगुले, भूपाल कुरणे, शरद जगताप आदी उपस्थित होते.
----------------
46377
दिव्यांग व्यक्तींच्या हस्ते विकास कामाचा प्रारंभ
इचलकरंजी : नवे दानवाड (ता. शिरोळ) येथे पंधरावा वित्त आयोग २०२०२-२१ व २०२१-२२ मधील कामाचे प्रारंभ दिव्यांग व्यक्तीच्या हस्ते करून समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केला. येथील उदय कांबळे घर ते मलाप्पा कांबळे घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरणाचा प्रारंभ दीपक कांबळे या दिव्यांग व्यक्तीच्याहस्ते केला. मारुती मंदिर मागील रस्ता काँक्रीटीकरणाचा प्रारंभ ज्येष्ठ दिव्यांग महादेवसिंग रजपूत यांच्या हस्ते केला. नवे दानवाड येथील सरपंच यांनी गावामध्ये यापूर्वी ही विधवा महिलांच्याहस्ते विकासकामाचा प्रारंभ करून पुरोगामी विचारांचा वसा व वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. सरपंच वंदना कांबळे, उपसरपंच कमल कांबळे, शोभाताई परीट, संगीता कांबळे, ग्रामसेवक उमेश रेळेकर, प्रकाश परीट आदी उपस्थित होते.
---------------
नाईट कॉलेजमध्ये रोटरॅक्ट क्लब पदग्रहण
इचलकरंजी : येथील नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्समधील रोटरॅक्ट क्लबच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात झाला. मावळते प्रेसिडेंट ऋषिकेश सासणे यांच्याकडून नवनिर्वाचित प्रेसिडेंट अजय टेके यांच्याकडे व मावळते सचिव श्रीनिवास सुतार यांच्याकडून नवनिर्वाचित सचिव केशवकुमार माने यांच्याकडे नवीन वर्षाची सूत्रे प्रदान केली. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी. डी. नारे होते. नुतन प्रेसिडेंट टेके यांनी चालू वर्षातील नूतन कार्यकारणी जाहीर केली. रोहित शहा, प्रविण खंजिरे, मनोज झंवर, विकेश बिचकर, आर. एल. कोरे, आदिनाथ कुरुकुले उपस्थित होते.
-------------
जवाहरनगर हायस्कूलमध्ये साहित्य वाटप
इचलकरंजी : गोरगरीब व होतकरू विद्यार्थ्यांनी ही मदत नेहमी कृतज्ञ होऊन करावी, असे प्रतिपादन कबनूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जयकुमार कोले यांनी केले. अग्रसेन सेवा मंडळामार्फत जवाहरनगर हायस्कूल येथे शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. मनिष हडलालका, भैरूलाल अगरवाल, विष्णूपसाद गोयंका यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक मुख्याध्यापिका के. यू. पोतदार यांनी केले. दत्तक घेतलेल्या विद्यार्थ्यांना गणवेश, स्कूल बॅग, चित्रकला साहित्य सोबत इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. एस. पी. जाधव, ए. एस. कांबळे उपस्थित होते.
----------------
चिमुकल्यांनी फोडली दहीहंडी
इचलकरंजी : कोरोची येथील चौगुले बालवाडीत दहीहंडीचे आयोजन केले होते. विकास चौगुले यांच्याहस्ते श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात केली. आयुष पद्मन व मैथिली रंगाटे या विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण व राधा यांची वेशभूषा साकारली होती. बाल चिमुकल्यांनी मनोरा तयार करून छोट्या श्रीकृष्णाने दहीहंडी फोडली.
-------
रिल्स विथ माझा बाप्पा स्पर्धा
इचलकरंजी : येथील श्री दत्त भेल अँड मोरतर्फे गणेशोत्सवानिमित्त रिल्स विथ माझा बाप्पा अशी अनोखी स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धा ही कलात्मक व प्रबोधनात्मक या दोन विषयावर आधारीत आहे. यामध्ये घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळे भाग घेवू शकणार आहेत. कलात्मक स्पर्धेसाठी तीन व प्रबोधनात्मकसाठी तीन बक्षीस असणार आहेत. प्रत्येकी १२ विजेत्यांना १२ बक्षिसे, सन्मानचिन्ह व ‘श्री’ ची चांदीची मूर्ती आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात येणार असल्याचे श्री दत्त भेळ अँड मोरचे चेअरमन बाबासो घुणके यांनी सांगितले.
----------------
‘लायन्स’ तर्फे स्लोगन, निबंध स्पर्धा
इचलकरंजी : लायन्स क्लबतर्फे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त स्लोगन व निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. निबंध स्पर्धेसाठी ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ व स्लोगनसाठी ‘हर घर तिरंगा’ हा विषय दिला होता. स्पर्धेच्या कमिटी चेअरमन म्हणून संगिता सारडा यांनी काम पहिले. महेंद्र बालर, सुभाष तोष्णीवाल, संदिप सुतार, महेश सारडा, गजानन होगाडे, कनकश्री भट्टड, कांता बालर उपस्थित होते.
-------------
इको फ्रेंडली गणपती कार्यशाळा
इचलकरंजी : येथील लायन्स क्लबतर्फे शंकरराव जाधव विद्यामंदिरमधील विद्यार्थ्यांसाठी इको फ्रेंडली गणपती तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात आली. प्रशिक्षिका रचना बगडिया यांनी मुलांना इको फ्रेंडली गणपती तयार करायला शिकवले. मुलांनी सुंदर व वेगवेगळ्या आकाराचे गणपती तयार करून त्याचे प्रदर्शनही केले. महेंद्र बालर, संदीप सुतार, कनकश्री भट्टड, कांता बालर, संगीता सारडा, कौसल्या सुतार, मुख्याध्यापिका गीता पाटील उपस्थित होते.
-------------
श्रावण मास समाप्तीनिमित्त धार्मिक सेवा
इचलकरंजी : नदीवेस नाका येथील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात श्रावणमास समाप्तीनिमित्त विविध धार्मिक सेवा केल्या. सकाळी भूपाळी आरतीनंतर रुद्र याग झाला. दिवसभर विशेष सेवा केल्या. भगवान शंकरांच्या पिंडीवर अखंड जलाभिषेक करून सायंकाळी दहीभात लेपण केले. १०८ बिल्वपत्र वाहून शिव अष्टत्तर शतनामावली पठण केले. सेवा केंद्रात श्रावण महिन्यात संस्कृत/मराठी रुद्र, शिवकवच, शिवमहिग्न स्तोत्र, द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र, श्री राम रक्षा, श्री सूक्त, कालभैरवाष्टक, श्री रुद्र गायत्री मंत्र, श्री संजीवनी मंत्र, अमृत संजीवनी मंत्र, श्री महामृत्युंजय मंत्र, शिवनामावली, शिवप्रार्थना अशा सामूहिक सेवा करून भगवान शंकरांच्या पिंडीवर १०८ बेलपत्रे वाहिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91405 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..