शेती पंप वीज बिलाची आकारणी करू नये : स्वाभिमानी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेती पंप वीज बिलाची आकारणी करू नये : स्वाभिमानी
शेती पंप वीज बिलाची आकारणी करू नये : स्वाभिमानी

शेती पंप वीज बिलाची आकारणी करू नये : स्वाभिमानी

sakal_logo
By

46289
--------------
शेती पंप वीज बिलाची आकारणी करू नये : स्वाभिमानी
इचलकरंजी, ता. २९ : इचलकरंजी शहर आणि परिसरातील शेतकऱ्यांची जून २०२२ ते ऑगस्ट २०२२ मध्ये शेती पंप वीज बिलाची आकारणी करण्यात येऊ नये. आकारणी तत्काळ रद्द करावी. शेतकऱ्यांना तत्काळ स्वतंत्र शेती पंप वीज मीटर बसवून द्यावीत. या मागणीचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महावितरण कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांना दिले. शेती पंपाची वीज कनेक्शन बंद केले, तर शेतकऱ्यांकडून महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा दिला.
निवेदनात २०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टी, तसेच पंचगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे तसेच २०२० मध्ये कोरोना आणि लॉकडाउन व यावर्षी आलेल्या महापुरामुळे इचलकरंजी शहर आणि परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. हजारो एकर शेती पाण्याखाली जाऊन पिके नष्ट झालेली आहेत. त्यामुळे शेतकरी दोन वर्षांपासून अक्षरश: मेटाकुटीस आले असून, त्यांचे आर्थिकदृष्ट्या कंबरडेच मोडले आहे. अशातच पावसाळ्यात शेतकऱ्यांकडून शेतीपंपाचा वापर होत नाही. पावसाळ्यात शेती पंप न वापरता सरासरीप्रमाणे शेती पंपाची वीज बिल आकारणी केली जाते. या व्यतरिक्त यापूर्वीही अनेक वेळा शेतकऱ्यांना स्वतंत्र शेती पंप वीज मीटर बसवून देण्याची मागणी केली आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे शेती पंप वीज बिल आकारणी करू नये. असे निवेदनात नमूद केले आहे. शिष्टमंडळात अभिषेक पाटील, महमद मुजावर, विष्णू साळुंखे, बाबासो पाटील, राजू शेख यांचा समावेश होता.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91425 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..