‘पाटबंधारे’च्या मुख्यालयात बदल करण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘पाटबंधारे’च्या मुख्यालयात बदल करण्याची मागणी
‘पाटबंधारे’च्या मुख्यालयात बदल करण्याची मागणी

‘पाटबंधारे’च्या मुख्यालयात बदल करण्याची मागणी

sakal_logo
By

46354
कोल्हापूर : पाटबंधारे विभागाच्या मुख्यालय बदलाबाबत महेश सुर्वे यांना निवेदन देताना अमृत शिंत्रे.

‘पाटबंधारे’च्या मुख्यालयात
बदल करण्याची मागणी
गडहिंग्लज : कोल्हापूर पाटबंधारे विभागाच्या (दक्षिण) मुख्यालयात बदल करण्याची मागणी भारतीय मराठा संघाचे संघटक अमृत शिंत्रे यांनी केली आहे. पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे यांना हे निवेदन दिले आहे. पाटबंधारे विभाग (दक्षिण) कोल्हापूर येथे कार्यान्वित आहे. या विभागाकडे गडहिंग्लज, आजरा, चंदगड व भुदरगड तालुक्यांतील सिंचन व्यवस्थापनाचे काम आहे. विभागीय कार्यालय सरासरी १०० किलोमीटर अंतरावर असल्याने या भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी लांबचा प्रवास करावा लागतो. गडहिंग्लज पाटबंधारे उपविभाग येथे विभागीय कार्यालय होण्यासाठी जागा संपादित केलेली आहे. या ठिकाणी विभाग स्थलांतरित करून शेतकऱ्यांची सोय करावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91477 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..